Join us

Shimron Hetmyer IPL 2022 : राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, मॅच विनर फलंदाजाने घेतला मायदेशी परतण्याचा निर्णय!

IPL 2022, Rajasthan Royals : इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या प्ले ऑफची शर्यत अधिक चुरशीची होत चालली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2022 15:30 IST

Open in App

IPL 2022, Rajasthan Royals : इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या प्ले ऑफची शर्यत अधिक चुरशीची होत चालली आहे. लखनौ सुपर जायंट्स व गुजरात टायटन्स या नव्याने दाखल झालेल्या संघांनी प्ले ऑफमधील स्थान जवळपास पक्के केले आहे. राजस्थान रॉयल्स उंबरठ्यावर येऊन पोहोचले आहेत, तर RCB, DC, SRH व PBKS हेही शर्यतीत आहेत. असे असताना राजस्थान रॉयल्सला रविवारी मोठा धक्का बसला. त्यांचा मॅच विनर फलंदाज बायो बबल सोडून मायदेशात परतला आहे. RR ने स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. RR ने पोस्ट केलेल्या व्हिडीओत युजवेंद्र चहलसह संघातील अनेक खेळाडू या फलंदाजाला मिठी मारून निरोप देताना दिसत आहेत.

राजस्थानचा संघ ११ सामन्यांनंतर १४ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि उर्वरित तीन लढतीत त्यांना एक विजय पुरेसा आहे. पण, तरीही संघातील मॅच फिनिशर शिमरोन हेटमायर ( Shimron Hetmyer) याने गयाना या आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. हेटमायरने ११ सामन्यांत ७२.७५च्या सरासरीने २९१ धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याच्या घरी परतण्याने संघाला मोठा धक्का बसला आहे. पण, हेटमायरच्या घरी परतण्यामागे तसं कारणही आहे. हेटमायर बाबा झाला आहे आणि आपल्या बाळाला भेटण्यासाठी तो मायदेशात परतला आहे. 

''आज सकाळी हेटमायर गयाना येथे गेला आहे. तो प्रथमच बाबा बनला आहे आणि तो आनंद साजरा करण्यासाठी तो कुटुंबियांना भेटायला गेला आहे. त्याला व त्याची पत्नी निर्वानी यांना खूप शुभेच्छा,''असे RR ने त्यांच्या सोशल मीडियावर लिहिले.    

टॅग्स :आयपीएल २०२२राजस्थान रॉयल्सवेस्ट इंडिज
Open in App