Join us  

लंकेविरोधातील पहिल्या कसोटीवर पावसाचे सावट

आज सकाळी कोलकातात पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे सकाळच्या सत्रात भारतीय संघाला सराव करता आला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 5:31 PM

Open in App

कोलकाता - येथे इडन गार्डन्सवर उद्यापासून सुरु होणाऱ्या भारत-श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यावर पावसाचे सावट आहे. आज सकाळी कोलकातात पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे सकाळच्या सत्रात भारतीय संघाला सराव करता आला नाही. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोलकातात शनिवारपर्यंत पाऊस पडण्याची शक्याता आहे. त्यामुळे कोलकाता कसोटीत पहिले तीन दिवस किती खेळ होईल यावर शंका निर्माण केली जात आहे. 

यापूर्वी श्रीलंकेत ऑगस्टमध्ये झालेल्या कसोटी मालिकेत विराटसेनेन वर्चस्व गाजवल होतं. त्यानंतर आता घरच्या मैदानावर भारत आपला विजयी फॉर्म कसा कायम राखतो याकडे सर्व क्रीडा प्रेमींच लक्ष लागलं आहे. मात्र भारतीय संघाकडून झालेल्या पराभवानंतर श्रीलंकेनेही दणक्यात पुनरागमन करत पाकिस्तानचा कसोटी मालिकेतपराभव केला, त्यामुळे श्रीलंकेला कमी लेखणं भारतीय संघाला झेपणारं नाही. सध्या विराट कोहलीचा भारतीय संघ हा चांगल्या फॉर्मात आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला घरच्या मैदानावर हरवल्यानंतर भारतासमोर श्रीलंकेचं आव्हान असणार आहे.  

श्रीलंकेविरुद्ध ९-० ने विजय मिळवल्याचा या मालिकेवर कुठलाही प्रभाव पडणार नसून कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान कायम राखण्यावर संघाचे लक्ष केंद्रित राहील, अशी प्रतिक्रिया भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने व्यक्त केली. भारताने श्रीलंका दौ-यात सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये सर्व सामने जिंकले. आता भारतीय संघ तीन कसोटी, तीन वन-डे व तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेचे यजमानपद भूषवित आहे. 

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौ-यावर जाणार आहे. या दौ-यात भारतीय संघ तीन कसोटी, सहा वन-डे व तीन टी-२० सामने खेळणार आहे.  

टॅग्स :क्रीडाक्रिकेटभारतीय क्रिकेट संघश्रीलंकाबीसीसीआय