Rahul Tewatia Wife Reaction, IPL 2022 GT vs PBKS: राहुल तेवातियाच्या दोन भन्नाट विजयी षटकारांनंतर स्टेडियममध्ये बसलेल्या त्याच्या पत्नीची दिल्ली अशी रिअ‍ॅक्शन, पाहा video

राहुल तेवातियाने २ चेंडूत १२ धावा हव्या असताना मारले दोन षटकार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 01:10 PM2022-04-09T13:10:18+5:302022-04-09T13:11:06+5:30

whatsapp join usJoin us
Rahul Tewatia Wife Riddhi Pannu eye catching Reaction goes viral after 2 match winning sixes IPL 2022 Gujarat Titans vs Punjab Kings watch Video | Rahul Tewatia Wife Reaction, IPL 2022 GT vs PBKS: राहुल तेवातियाच्या दोन भन्नाट विजयी षटकारांनंतर स्टेडियममध्ये बसलेल्या त्याच्या पत्नीची दिल्ली अशी रिअ‍ॅक्शन, पाहा video

Rahul Tewatia Wife Reaction, IPL 2022 GT vs PBKS: राहुल तेवातियाच्या दोन भन्नाट विजयी षटकारांनंतर स्टेडियममध्ये बसलेल्या त्याच्या पत्नीची दिल्ली अशी रिअ‍ॅक्शन, पाहा video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Rahul Tewatia Wife Reaction Video, IPL 2022 GT vs PBKS: गुजरात टायटन्स संघाने पंजाब किंग्स संघावर शुक्रवारच्या सामन्यात रोमहर्षक असा विजय मिळवला. लियम लिव्हिंगस्टोनच्या अर्धशतकाच्या जोरावर पंजाब किंग्जने १८९ धावांपर्यंत मजल मारली होती आणि गुजरातला १९० धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सचा राहुल तेवातिया मैदानावर होता. शेवटच्या दोन चेंडूत १२ धावांची आवश्यकता असताना तेवातियाने चक्क दोन चेंडूत दोन षटकार मारत गुजरातला सामना जिंकवून दिला आणि साऱ्यांनाच आश्चर्यचकित केले. यावेळी राहुल तेवातियाची पत्नी स्टेडियममध्ये बसली होती. तिने दिलेली रिअ‍ॅक्शनही चर्चेत राहिली.

तेवातियाने शेवटच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर जो फटका मारला तो जेमतेम सीमारेषेपार गेला. एका फिल्डरने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला पण त्याला चेंडूत आत ढकलता आला नाही. त्यानंतर शेवटचा चेंडूदेखील ओडियन स्मिथने तसाच टाकला. यावेळी राहुल तेवातिया तशा चेंडूसाठी सज्ज होता. त्यामुळे त्याने पटकन चेंडूवर आक्रमक चढवत उत्तुंग असा षटकार लगावला आणि संघाला विजय मिळवून दिला. त्यावेळी स्टेडियममध्ये हार्दिक पांड्याची पत्नी नताशा हिच्या मागच्याच रांगेत बसलेली तेवातियाची पत्नी हिला यावर विश्वासच बसत नव्हता.

तेवातियाची पत्नी केवळ दोन हात वर करून आनंद व्यक्त करत उभी राहिली. पण काही क्षणांपूर्वी जे घडलं त्यावर तिचाही विश्वास बसला नाही. व्हिडीओमध्ये तिच्या चेहऱ्यावरील आश्चर्य स्पष्टपणे दिसलं. तसेच, शेजारी असलेली तिची मैत्रिण तिचं अभिनंदन करत तिला 'आपण खरंच जिंकलोय' असं सांगताही दिसली. पाहा व्हिडीओ-

दरम्यान, IPLच्या इतिहासात शेवटच्या दोन चेंडूत १२ धावांची गरज असताना दोन षटकार मारून संघाला जिंकवून देणारा तेवातिया दुसरा खेळाडू ठरला. या आधी महेंद्रसिंग धोनीने देखील हा पराक्रम केला होता.

Web Title: Rahul Tewatia Wife Riddhi Pannu eye catching Reaction goes viral after 2 match winning sixes IPL 2022 Gujarat Titans vs Punjab Kings watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.