Join us

राहुलची तिसऱ्या स्थानावर झेप आयसीसी टी २0 क्रमवारी

आघाडीचा फलंदाज लोकेश राहुलने इंग्लंडविरुद्ध झालेल्या टी२0 मालिकेतील सुरेख कामगिरीच्या बळावर आयसीसी टी२० क्रमवारीत ९ क्रमांकांनी झेप घेत तिसरे स्थान पटकावले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 00:46 IST

Open in App

दुबई  - आघाडीचा फलंदाज लोकेश राहुलने इंग्लंडविरुद्ध झालेल्या टी२0 मालिकेतील सुरेख कामगिरीच्या बळावर आयसीसी टी२० क्रमवारीत ९ क्रमांकांनी झेप घेत तिसरे स्थान पटकावले. भारतीय संघही दुसºया क्रमांकावर पोहोचला आहे.आयसीसीच्या ताज्या विश्व क्रमवारीनुसार आॅस्ट्रेलियन सलामीवीर फलंदाज अ‍ॅरोन फिंच टी २0 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९00 रेटिंग गुण प्राप्त करणारा पहिला फलंदाज बनला आहे. त्याने तीन क्रमांकांनी झेप घेत फलंदाजांच्या अव्वल स्थान मिलवले. त्यानंतर पाकिस्तानचा फखर जमा आणि भारताचा स्टार राहुलचा क्रमांक लागतो. सांघिक क्रमवारीत आयर्लंडचा २-0 व इंग्लंडचा २-१ असा पराभव करणारा भारत दुसºया क्रमांकावर पोहचला आहे.

टॅग्स :क्रिकेटक्रीडा