राहुल पाचव्या स्थानाचा सर्वोत्तम पर्याय- संजय मांजरेकर

राहुलने यंदा जानेवारीत आॅस्ट्रेलियाविरुद्ध स्थानिक एकदिवसीय मालिकेत मध्य फळीत दमदार फलंदाजी केली होती. शानदार फलंदाजीचा हाच फॉर्म त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान कायम राखला होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 23:38 IST2020-03-23T23:29:52+5:302020-03-23T23:38:09+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Rahul is the fifth best option - Sanjay Manjrekar | राहुल पाचव्या स्थानाचा सर्वोत्तम पर्याय- संजय मांजरेकर

राहुल पाचव्या स्थानाचा सर्वोत्तम पर्याय- संजय मांजरेकर

मुंबई : युवा फलंदाज लोकेश राहुल हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाचव्या स्थानावर फलंदाजीसाठी सर्वोत्तम पर्याय असल्याचे मत माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी व्यक्त केले आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाने सुरेश रैना आणि युवराजसिंग यांच्यासारख्या फलंदाजांचा पर्याय शोधायला हवा, असेही मांजरेकर म्हणाले.
राहुलने यंदा जानेवारीत आॅस्ट्रेलियाविरुद्ध स्थानिक एकदिवसीय मालिकेत मध्य फळीत दमदार फलंदाजी केली होती. शानदार फलंदाजीचा हाच फॉर्म त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान कायम राखला होता.
कर्नाटकचा हा खेळाडू एकदिवसीय क्रिकेटमध्ये यष्टिरक्षणाचीदेखील जबाबदारी पारव पाडत आहे. भारताकडून ३७ कसोटी आणि ७४ एकदिवसीय सामने खेळलेल्या मांजरेकर यांनी टिष्ट्वटरपेजवर चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना लोकेश राहुलच्या खेळीचा गौरव केला. एकदिवसीय सामन्यात भारताकडून राहुलला पाचव्या स्थानावर फलंदाजीला पाठविणे सुरू ठेवावे किंवा त्याच्याऐवजी अन्य नावाचा विचार केला जाऊ शकतो, या आशयाचा प्रश्न मांजरेकर यांना विचारण्यात आला होता. यावर मांजरेकर म्हणाले, ‘सध्यातरी राहुल या स्थानावर अतिशय उपयुक्त फलंदाज आहे. तथापि रैना आणि युवराजसारख्या तडफदार फलंदाजांचाही शोध घेण्याची गरज आहे. असे फलंदाज गवसल्यास राहुलला नंतर आघाडीच्या स्थानावर फलंदाजीसाठी पाठविणे सोपे होईल.’ (वृत्तसंस्था)

- आॅस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० विश्वचषकात चौथ्या स्थानावर खेळणारा फलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूबाबत विचारताच मांजरेकर म्हणाले, ‘श्रेयस अय्यर चौथ्या स्थानासाठी आणि हार्दिक पांड्या अष्टपैलू खेळाडू म्हणून सर्वोत्कृष्ट पर्याय आहेत.’
अय्यर याने न्युझीलंड विरोधातील मालिकेत चौथ्या स्थानावर खेळताना चांगली कामगिरी केली.

- रणजी करंडकात मुंबईच्या दारुण अवस्थेबाबत मांजरेकर म्हणाले, ‘संघाला कल्पक नेतृत्व लाभत नसल्यामुळे अशी अवस्था होत आहेत. विजयासाठी कुठल्या गोष्टींची गरज आहे, याचे ज्ञान असलेल्या खेळाडूच्या हातात नेतृत्व सोपविण्याची वेळ आली आहे.’

- राहुल याने ३२ एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ८७.०६ च्या सरासरीने १२३९ धावा केल्या आहेत. त्याने ३६ कसोटीत २००६ धावा केल्या. तर त्याची सरासरी ५६.४५ आहे. टी२० त्याने ४२ सामन्यात १४६१ धावा केल्या आहेत.

Web Title: Rahul is the fifth best option - Sanjay Manjrekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.