Join us  

राहुल द्रविडने सांगितला खेळाडूंच्या यशस्वी आयुष्याचा फॉर्म्युला

आता या फॉर्म्युलावर बीसीसीआय कितपत गंभीरपणे विचार करते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 4:12 PM

Open in App

नवी दिल्ली : फक्त चांगला खेळ केला म्हणजे आयुष्यात यशस्वी होता येते असे नाही. काही खेळाडूंना गुणवत्ता असूनही संधी मिळत नाही. ज्या खेळाडूंना फक्त आपला खेळच माहिती असतो आणि त्यांना जर संधी मिळाली नाही तर भविष्यात करायचे काय, हा प्रश्न त्यांना सतावत असतो. काही खेळाडू निराशेच्या गर्तेत अडकतात, पण असे घडू नये यासाठी भारताचा माजी महान फलंदाज आणि युवा संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने एक फॉर्म्युला सांगितला आहे. आता या फॉर्म्युलावर बीसीसीआय कितपत गंभीरपणे विचार करते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

द्रविड, अन्य काही प्रशिक्षक आणि बीसीसीआयशी संलग्न असलेले काही अधिकारी यांच्यामध्ये एक बैठक झाली. यामध्ये द्रविडने खेळाडूंच्या भविष्याबाबत काही गोष्टींवर प्रकाशझोत टाकला. जर खेळाडू गुणवत्ता असूनही मोठ्या स्तरावर पोहोचण्याच अपयशी ठरला आणि त्याने खेळ सोडू दिला, तर त्यानंतर त्याने काय करायचे, या विषयावर द्रविडने आपले मत व्यक्त केले. द्रविड फक्त आपले मत व्यक्त करून थांबला नाही, तर त्याने यासाठी काय उपाय योजना करायला हव्यात, हेदेखील सांगितले.

या बैठकीनंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे मुख्य प्रशासकीय अधिकारी तुफान घोष यांनी सांगितले की, " द्रविडसह काही प्रशिक्षकांनी आमच्यापुढे खेळाडूंच्या भविष्याबाबत काही मुद्दे मांडले आहेत. हे सारे फक्त त्यांचा खेळाडू म्हणून विचार करत नसून एक व्यक्ती म्हणूनही विचार करत आहेत आणि हीच सर्वात चांगली गोष्ट आहे. "

घोष पुढे म्हणाले की," द्रविड यांनी आम्हाला याबाबत काही गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले, काही खेळाडू वयाच्या 21-25 वयापर्यंत क्रिकेट खेळतात. त्यानंतर त्यांनी जर क्रिकेट सोडले तर त्यांचे भविष्य अधांतरी होऊ शकते. त्यामुळे त्यांना करिअर मार्गदर्शन करणे महत्वाचे आहे. "

टॅग्स :राहूल द्रविडबीसीसीआय