Join us  

द्रविड म्हणजे शुद्ध घी, तर शास्त्री म्हणजे डालडा; बीसीसीआयच्या फोटोवर चाहत्याची भन्नाट कमेंट

बीसीसीआयने आपल्या ट्विटवर पोस्ट केला. त्यावेळी चाहत्यांनी शास्त्री यांची चांगलीच हुर्यो उडवल्याचे पाहायला मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 4:56 PM

Open in App

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा ट्वेन्टी-20 सामना बंगळुरु येथे होणार आहे. भारतीय संघ बंगळुरु येथे दाखल झाला आहे. भारतीय संघ आज सराव करत असताना भारताचा माजी महान क्रिकेटपटू आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने भेट दिली. यावेळी द्रविड आणि भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांची भेट झाली. या दोघांच्या भेटीचा फोटो बीसीसीआयने आपल्या ट्विटवर पोस्ट केला. त्यावेळी चाहत्यांनी शास्त्री यांची चांगलीच हुर्यो उडवल्याचे पाहायला मिळाले. एका चाहत्याने तर चक्क 'द्रविड म्हणजे शुद्ध घी, तर शास्त्री म्हणजे डालडा' अशी कमेंट केली आहे.

बीसीसीआयच्या फोटोवरून चाहत्यांनी शास्त्री यांना चांगलेच ट्रोल केले आहे. बीसीसीआयने हा फोटो अपलोड केल्यावर चाहत्यांनी त्यावर कमेंट्सचा पाऊस पाडला. यामधील काही कमेंट्स चांगल्या इंटरेस्टींग होत्या. भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या धडाकेबाज अर्धशतकाच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेवर दुसऱ्या ट्वेन्टी-20 लढतीत दमदार विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने भारतापुढे विजयासाठी 150 धावांचे आव्हान ठेवले होते. कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने हे आव्हान सात विकेट्स राखत सहज पूर्ण केले. या विजयासह भारताने या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.विजयी आव्हानाचा पाठलाग करताना भारताला रोहित शर्माच्या रुपात पहिला धक्का बसला, रोहितला 12 धावा करता आल्या. रोहित बाद झाल्यावर कोहली आणि धवन यांची चांगलीच जोडी जमली. धवनने 40 धावांची खेळी साकारली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी रचली. पण धवन बाद झाल्यावर रिषभ पंतही चार धावांवर बाद झाला. पण त्यानंतर कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.कर्णधार क्विंटन डीकॉक आणि तेंदा बवुमा यांच्या दमदार खेळींच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने आव्हानात्मक धावसंख्या उभारली. या दोघांच्या दमदार खेळींमुळेच दक्षिण आफ्रिकेला भारतापुढे 150 धावांचे आव्हान ठेवता आले.भारताने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. क्विंटन डीकॉकने सुरुवातीपासूनच जोरदार हल्ला भारताच्या गोलंदाजीवर चढवला. क्विंटन डीकॉकने 37 चेंडूंत आठ चौकारांच्या जोरावर 52 धावांची खेळी साकारली. क्विंटन डीकॉक बाद झाल्यावर पदार्पण करणाऱ्या बवुमाने भारताच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. बवुमाने तीन चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 49 धावा केल्या.

टॅग्स :राहूल द्रविडरवी शास्त्री