चेन्नई : सलामीवीर शिखर धवनचे स्थान अजिंक्य रहाणेला मिळू शकते, असे संकेत भारताचा उपकर्णधार रोहित शर्माने दिले आहेत. वैयक्तिक कारणामुळे धवन आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या तीन वन-डे सामन्यांत खेळणार नाही.
रोहित म्हणाला, ‘आमची बेंच स्ट्रेंथ मजबूत आहे. शिखरची उणीव निश्चितच भासेल. तो शानदार फॉर्मात असून संघाच्या यशात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपासून श्रीलंका दौºयापर्यंत त्याने चमकदार कामगिरी केली आहे. पण, आमच्याकडे त्याचे स्थान घेण्याची क्षमता असलेले काही खेळाडू आहेत. अजिंक्य त्यापैकी एक आहे. वेस्ट इंडिजमध्ये त्याने चांगली कामगिरी करत मालिकावीराचा पुरस्कार पटकावला होता.’