Join us  

कसोटी संघात जागा न मिळालेला अश्विन भारतात परतणार नाही

दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये अश्विनला संधी मिळालीच नाही. आता तो संघाबरोबर भारतात येणार नसल्याचे वृत्त आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2019 8:40 PM

Open in App

नवी दिल्ली : काही महिन्यांपूर्वी आर. अश्विन हा भारताच्या कसोटी संघाचा अविभाज्य भाग होता. त्याचबरोबर वेस्ट इंडिजबरोबर आतापर्यंतची त्याची दमदार कामगिरी साऱ्यांनीच पाहिली आहे. त्यामुळे या दौऱ्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात अश्विन खेळणार, असे बऱ्याच जणांना वाटले होते. पण दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये अश्विनला संधी मिळालीच नाही. आता तो संघाबरोबर भारतात येणार नसल्याचे वृत्त आहे. 

पहिल्या कसोटी सामन्यात अश्विनऐवजी रवींद्र जडेजाला पसंती देण्यात आली. पहिल्या सामन्यात जडेजाने चांगली कामगिरी केली. त्यामुळे दुसऱ्या सामन्यातही जडेजालाच संघात कायम ठेवले गेले. पण या सामन्यात भारताला ऑफ स्पिनरची कमतरता जाणवली नाही. कारण हनुमा विहारीने यावेळी त्याची कमी भरून काढली.

कसोटी संघात जागा न मिळाल्याचा राग आता अश्विन काढतोय का, असे तुम्हाला वाटेल. कसोटी मालिका जिंकल्यावर भारतीय संघ मायदेशी येण्यासाठी निघणार आहे. पण त्यांच्याबरोबर अश्विन मात्र तुम्हाला दिसणार नाही. कारण अश्विन हा वेस्ट इंडिजमधून थेट इंग्लंडला जाणार आहे. इंग्लंडमधील कौंटी क्रिकेटमध्ये अश्विन हा नॉटिंघमशायरकडून खेळतो. आता तिथे सामने सुरु आहेत. दुसरीकडे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यांना 15 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सुरुवातीला ट्वेन्टी-20 आणि त्यानंतर एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकांमध्ये अश्विन खेळणार नाही. त्यामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामन्यांना बराच वेळ असल्यामुळे अश्विन इंग्लंडमध्ये खेळत राहणार आहे.

टॅग्स :आर अश्विनभारतवेस्ट इंडिजद. आफ्रिका