R Ashwin BBL India Pakistan: भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने ऑस्ट्रेलियन टी२० लीग म्हणजेच बिग बॅश लीग स्पर्धेत सिडनी थंडर संघासोबत करार करण्यावर सहमती दर्शविली आहे. बिग बॅशमध्ये एखाद्या हाय-प्रोफाइल भारतीय खेळाडूने मैदानात उतरण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. फॉक्स स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, अलीकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमधून निवृत्त झालेला अश्विन आता सिडनी थंडरमध्ये सामील होणार आहे. त्यात महत्त्वाची बाब म्हणजे, तो पाकिस्तानी सहकाऱ्यासोबत एकाच संघात खेळणार आहे.
डेव्हिड वॉर्नरसोबत खेळणार
३९ वर्षीय अश्विन जानेवारीमध्ये ILT20 संपल्यानंतर सिडनी थंडर संघात सामील होईल. तो डेव्हिड वॉर्नर आणि सॅम कॉन्स्टास सारख्या स्टार्ससोबत खेळेल. अश्विनने गेल्या वर्षी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि अलीकडेच आयपीएलमधूनही माघार घेतली. तो आता जगभरातील इतर टी२० लीगमध्ये नशीब आजमावून पाहणार आहे. बिग बॅशमध्ये त्याचे आगमन संघाला बळकटी देईलच, पण त्यासोबतच ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायासाठी एक मोठे आकर्षण ठरेल.
पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात
क्रिकेट ऑस्ट्रेलियाला या वर्षी बीबीएलच्या परदेशी खेळाडूंच्या ड्राफ्ट नियमांमध्ये विशेष सूट द्यावी लागेल. बिग बॅश क्लबना त्यांच्या पगाराच्या मर्यादेत तीन परदेशी खेळाडूंना साइन करण्याची परवानगी आहे. जूनच्या ड्राफ्टमध्ये थंडरने न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन आणि पाकिस्तानचा अष्टपैलू शादाब खानला संघात घेतले आहे. तर इंग्लंडचा विकेटकीपर सॅम बिलिंग्ज आधीच क्लबसोबत अनेक वर्षांपासून करारबद्ध आहे. त्यामुळे विशेष सूट देऊन अश्विनला करारबद्ध करण्यात येईल. अशा परिस्थितीत अश्विन पाकिस्तानचा शादाब खान याच्यासोबत एकाच संघातून खेळेल.
Web Summary : R. Ashwin is set to join Sydney Thunder in the BBL, becoming the first high-profile Indian player in the league. He will play alongside David Warner and Pakistani all-rounder Shadab Khan after his ILT20 stint. This move will boost the team and attract the Indian community in Australia.
Web Summary : आर. अश्विन बीबीएल में सिडनी थंडर में शामिल होने के लिए तैयार हैं, जो लीग में पहले हाई-प्रोफाइल भारतीय खिलाड़ी बन गए हैं। वह डेविड वार्नर और पाकिस्तानी ऑलराउंडर शादाब खान के साथ अपने आईएलटी20 कार्यकाल के बाद खेलेंगे। यह कदम टीम को बढ़ावा देगा और ऑस्ट्रेलिया में भारतीय समुदाय को आकर्षित करेगा।