Join us  

बंदा ये बिनधास्त हैं! संघातून डच्चू मिळणार असला तरी अश्विन निर्धास्त

भारताने पहिल्या सामन्यात विजय मिळवला. त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यात अश्विनला संधी मिळण्याची शक्यता धुसर वाटत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 8:44 PM

Open in App

नवी दिल्ली : फिरकीपटू आर. अश्विनला वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताच्या संघात संधी देण्यात आली नाही. भारताने पहिल्या सामन्यात विजय मिळवला. त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यात अश्विनला संधी मिळण्याची शक्यता धुसर वाटत आहे. त्याचबरोबर आयपीएलमधीलकिंग्ज इलेव्हन पंजाबचा संघही अश्विनला डच्चू देण्याच्या तयारीत आहे. पण अश्विनला मात्र या गोष्टींचा फरक पडत नाही. त्याचा वावर एकदम बिनधास्त आहे. पण अश्विनला का टेंशन नाही, हे तुम्हाला माहिती आहे का....

सध्याच्या घडीला अश्विन हा भारताच्या ट्वेन्टी-20 आणि एकदिवसीय संघात नाही. अश्विन हा फक्त भारताच्या कसोटी संघात आहे. पण वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अश्विनला संधी देण्यात आली नाही. त्यामुळे आता भारताच्या संघात अश्विन दिसणार की नाही, याबाबत चर्चा सुरु झाली आहे.

पंजाबचे नेतृत्व करताना अश्विनला समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. पण तरीही त्याला आपल्या संघात घेण्यासाठी आयपीएल मधील दोन संघ तयार आहे. यामधील पहिला संघ आहे दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि दुसरा आहे राजस्थान रॉयल्स. जर अश्विनला पंजाबच्या संघाने डच्चू दिला किंवा त्याने संघ सोडायचा निर्णय घेतला तर त्याच्याकडे या दोन संघांच्या ऑफर आहेत.

अश्विनला संघात न घेतल्यामुळे भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी कर्णधार विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्यावर शुक्रवारी जोरदार टीका केली होती. आतापर्यंत वेस्ट इंडिजविरुद्ध अश्विनची कामगिरी जबरदस्त राहीलेली आहे. दमदार कामगिरी असताना अश्विनला संघात का घेण्यात आले नाही, हा सवाल त्यांनी कोहली आणि शास्त्री यांच्यासह संघ व्यवस्थापनाला विचारला आहे.

समालोचन करताना गावस्कर कोहलीवर आणि रवी शास्त्री यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी जो भारताचा संघ निवडण्यात आला, त्यावर गावस्कर रागावलेले पाहायला मिळाले.

गावस्कर म्हणाले की, " वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी जो भारताचा संघ निवडण्यात आला आहे, ते पाहून मला धक्का बसला आहे. आर. अश्विनचा आतापर्यंत चांगला रेकॉर्ड राहीलेला आहे, त्याचबरोबर वेस्ट इंडिजबरोबर त्याची कामगिरी उजवी राहीलेली आहे. त्यामुळे त्याला संघात स्थान न देणे, हे धक्कादायक आहे."

अश्विनने वेस्ट इंडिजविरुद्ध 11 कसोटी सामन्यांमध्ये 552 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये चार शतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर 60 बळीही मिळवले आहे. त्यामुळे एवढी जबरदस्त कामगिरी असताना अश्विनला संघाबाहेर ठेवणे गावस्कर यांना पटलेले दिसत नाही. 

टॅग्स :आर अश्विनआयपीएलकिंग्ज इलेव्हन पंजाब