Join us

"तो कशाबद्दल बोलतोय", अश्विनने भन्नाट फोटो टाकला अन् चहलने दिले १० हजार; नेमकं झालं काय?

 R ashwin and yuzvendra chahal : सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 17:34 IST

Open in App

नवी दिल्ली : राजस्थान रॉयल्सचा (rajasthan royals) फिरकीपटू युजवेंद्र चहल नेहमी सहकारी खेळाडूंशी मस्ती करत असतो. सतत इतरांची खिल्ली उडवणारा चहल आता स्वत:च जाळ्यात फसल्याचे पाहायला मिळते आहे. राजस्थान रॉयल्सचा अष्टपैलू रवीचंद्रन अश्विनने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. हे ट्विट डिलीट करण्यासाठी चहल दहा हजार रूपये देण्यास तयार झाला. 

नेमकं झालं काय? खरं तर अश्विनने ट्विटरवर युजवेंद्र चहलचा एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये त्याने विचारले की, तो कोणाशी बोलत आहे? फक्त चुकीचे उत्तर अपेक्षित आहे. यानंतर चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी काही भन्नाट उत्तरे देऊन चहलची फिरकी घेतली. 

चहलने अश्विनला दिले १० हजारचहलने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये त्याने अश्विनला १० हजार रूपये ट्रान्सफर केले होते. त्याने कॅप्शनमध्ये लिहले, "१००-२०० आणखी घे पण हे ट्विट डिलीट कर. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, भाई." दोन्ही खेळाडूंच्या या नाट्यमय घडामोडी पाहून नेटकरी देखील त्यांची चांगलीच शाळा घेत आहेत. काही चाहते याला CREDच्या जाहीरातीचा एक भाग असल्याचे म्हणत आहेत. 

दरम्यान, आयपीएलच्या सोळाव्या हंगामात युजवेंद्र चहल शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याने सहा सामन्यांमध्ये ११ बळी घेतले आहेत. मागील वर्षी देखील चहलने १७ सामन्यांत २७ बळी घेतले होते आणि पर्पल कॅप पटकावली होती. चहल मोठ्या कालावधीपर्यंत आरसीबीच्या फ्रँचायझीचा भाग होता पण मेगा लिलावापूर्वी त्याला बंगळुरूच्या फ्रँचायझीने रिलीज केले होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :आयपीएल २०२३आर अश्विनयुजवेंद्र चहलराजस्थान रॉयल्स
Open in App