तामिळनाडू प्रीमियर लीग २०२५ मध्ये आयड्रीम तिरुप्पुर तमिझान्स आणि डिंडीगुल ड्रॅगन्स यांच्यात रविवारी सामना खेळला गेला. या सामन्यात डिंडीगुल ड्रॅगन्सचा कर्णधार महिला अंपायवर भडकल्याचे पाहायला मिळाले. साई किशोरच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू आऊट दिल्यानंतर अश्विन मैदानातील महिला अंपायरजवळ गेला आणि त्यांच्याशी वाद घालू लागला. त्यानंतर त्याने पॅव्हेलियनकडे जाताना स्वत: पॅडवर बॅट मारली. अश्निनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
डिंडीगुल ड्रॅगन्सच्या डावातील पाचव्या षटकात साई किशोरच्या गोलंदाजीवर अश्विनने स्वीप मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, चेंडू त्याच्या पॅडला लागला. यानंतर साई किशोर अपील केली आणि अंपायर आऊट दिले. चेंडू लेग- स्टंपच्या बाहेर असतानाही अंपायरने आऊट दिल्याने अश्निन नाराज झाला. त्याने अंपायरला पटवून देण्याचा प्रयत्न केला की, हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पडला आहे. मात्र, तरीही पंचांनी त्याच्याकडे लक्ष दिले नाही आणि त्या पुढे चालत गेल्या. यामुळे अश्निन भडकला आणि स्वत:च्या पॅटवर बॅट मारली.
अश्विनने गेल्या वर्षाच्या अखेरीस सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर अश्विनचा फॉर्म सतत घसरत चालला आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामातही तो सीएसकेसाठी चांगली कामगिरी करू शकला नाही. या हंगामात तो फक्त ७ विकेट्स घेऊ शकला.
डिंडीगुल ड्रॅगन्स दारूण पराभवया सामन्यात आयड्रीम तिरुप्पुर तमिझान्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना डिंडीगुल ड्रॅगन्सचा संपूर्ण संघ १६.२ षटकांत ९३ धावांवर ऑलआऊट झाला. डिंडीगुल ड्रॅगन्सकडून शिवम सिंगने ३० शिवम सिंगने सर्वाधिक ३० धावा केल्या. तर, अश्विन आणि आरके जयंतने प्रत्येकी १८-१८ धावांचे योगदान दिले. तमिझान्सकडून गोलंदाजी करताना एसाकिमुथुने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तर, साई किशोरने दोन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात तिरुप्पुर तमिझान्सने अवघ्या ११.५ षटकांत हा सामना जिंकला. यष्टीरक्षक तुषार रहेजाने ३९ चेंडूत ६५ धावांची वादळी खेळी केली. त्याच्या व्यतिरिक्त अमितने १३ आणि राधाकृष्णाने १४ धावा केल्या.