Join us  

कोणती क्वालिटी जी तुझ्यात आहे, पण सचिन, कोहली, धोनी यांच्यात नाही? गांगुलीचं एका शब्दात उत्तर

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा ( BCCI ) माजी अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) याला टीम इंडियाच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक मानले जाते.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 2:21 PM

Open in App

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा ( BCCI ) माजी अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) याला टीम इंडियाच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक मानले जाते. गांगुलीने एकूण ३११ वन डे सामने आणि ११३ कसोटी सामने खेळताना अनुक्रमे ११३६३ व ७२१२ धावा केल्या आहेत. आक्रमक फलंदाजीच्या शैलीसाठी ओळखल्या जाणार्‍या गांगुलीने २००३च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचे नेतृत्व सांभाळले होते आणि संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवले होते, परंतु अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघ पराभूत झाला होता. महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि त्याच्या जोडीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रमही नोंदवले आहेत. 

अलीकडेच कोलकाता नाईट रायडर्सचा माजी कर्णधार आणि दिल्ली कॅपिटल्स संघाचा मेंटॉर गांगुलीने एका रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता. जिथे त्याला सचिन, विराट कोहली आणि एमएस धोनी यांच्याकडून एक गुण घ्यायचा झाल्यास कोणता घेशील, असा प्रश्न विचारला गेला. त्यावर गांगुलीने उत्तर दिले की, सचिनचा ग्रेटनेस, विराटची आक्रमकता आणि धोनीचा संयम... 

गांगुलीने वन डे क्रिकेटमध्ये २२ शतकं आणि ७२ अर्धशतकं झळकावली आहेत. कसोटीत एक द्विशतक, १६ शतकं आणि ३५ अर्धशतकं त्याने ठोकली आहेत. त्याने इंडियन प्रीमियर लीगमध्ये देखील ५९ सामन्यांत ७ अर्धशतकांसह १३४९ धावा केल्या आहेत. पुढे त्याला विचारले गेले की, तुझ्याकडे अशी कोणती क्वालिटी आहे, जी सचिन, विराट, धोनी यांच्याकडे नाही. त्यावर गांगुलीने एका शब्दात उत्तर दिले आणि ते म्हणजे, अॅडजस्टमेंट  

गांगुलीच्या उत्तराने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले आणि सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. तत्पूर्वी, गांगुलीने कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा यांना जूनमध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी भारताच्या संघात स्थान देण्याचे समर्थन केले होते. " रोहितने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत संघाचे कर्णधारपद भूषवायला हवे. विराट कोहलीही तिथे असला पाहिजे,''असे तो म्हणाला होता. 

टॅग्स :सौरभ गांगुलीसचिन तेंडुलकरऑफ द फिल्डमहेंद्रसिंग धोनीविराट कोहली