Join us

Qualifier 1, MI vs DC: रोहित शर्मानं केली हरभजन सिंग व पार्थिव पटेल यांच्या 'नकोशा' विक्रमाशी बरोबरी, Video

Qualifier 1, MI vs DC Latest News & Live Score : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वातील अंतिम सामन्यात प्रवेश करणारा पहिला संघ आज ठरेल.

By स्वदेश घाणेकर | Updated: November 5, 2020 19:48 IST

Open in App

Qualifier 1, MI vs DC Latest News & Live Score : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वातील अंतिम सामन्यात प्रवेश करणारा पहिला संघ आज ठरेल. मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) हे दोन संघ Qualifier 1 सामन्यात भिडणार आहे. MIला अखेरच्या साखळी सामन्यात पराभवाचा तोंड पहावं लागलं, तर DCनं अखेरचा सामना जिंकून प्ले ऑफसाठीचं स्थान पक्कं केलं. पण, MIनं दुसऱ्या टप्प्यात चांगली कामगिरी केली, तेच दुसरीकडे DCची गाडी रुळावरून घसरलेली दिसली. त्यांना सलग पाच सामन्यांत पराभव पत्करावा लागला. 

- दिल्ली कॅपिटल्सनं ( DC) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात तीन बदल; OUT

- सौरभ तिवारी, धवल कुलकर्णी, जेम्स पॅटिन्सन, IN -हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट

- मुंबई इंडियन्सचा संघ - रोहित शर्मा, क्विंटन डी'कॉक, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, किरॉन पोलार्ड, नॅथन कोल्टर-नायल, जसप्रीत बुमराह, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट

- दिल्ली कॅपिटल्स संघ - पृथ्वी शॉ, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, मार्कस स्टॉयनिस, डॅनिएल सॅम्स, अक्षर पटेल, आर अश्विन , कागिसो रबाडा, अॅनरिच नॉर्ट्झे

क्विंटन डी'कॉकनं पहिल्याच षटकात १५ धावा चोपून मुंबईला दमदार सुरूवात करून दिली. पण, दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरनं दुसऱ्याच षटकात आर अश्विनला गोलंदाजीला आणले. त्यानं पहिल्याच चेंडूवर रोहित शर्माला ( ०) पायचीत करून माघारी पाठवले. या कामगिरीसह रोहितनं आयपीएलमध्ये सर्वाधिक १३वेळा भोपळ्यावर बाद होण्याच्या हरभजन सिंग व पार्थिव पटेल यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. पाहा व्हिडीओ...

टॅग्स :IPL 2020मुंबई इंडियन्सदिल्ली कॅपिटल्स