Join us  

टीम इंडियाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठणं अवघड?; जाणून घ्या समीकरण

न्यूझीलंड संघानं ICC World Test Championship स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्याचा पहिला मान पटकावल्यानंतर भारत-इंग्लंड कसोटी मालिकेकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: February 09, 2021 2:46 PM

Open in App

न्यूझीलंड संघानं ICC World Test Championship स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्याचा पहिला मान पटकावल्यानंतर भारत-इंग्लंड कसोटी मालिकेकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील दुसरा प्रतिस्पर्धी भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतून ठरणार आहे. ऑस्ट्रेलियाही या शर्यतीत आहे, परंतु त्यांनी दक्षिण आफ्रिका दौरा ( ३ कसोटी मालिका) स्थगित करण्याचा निर्णय घेतला अन् त्यांनाही भारत-इंग्लंड मालिकेवरच अवलंबून राहावं लागत आहे. आता इंग्लंडनं पहिल्या कसोटीत २२७ धावांनी विजय मिळवून चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या विजयामुळे इंग्लंडनं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतक्त्यात ( ICC World Test Championship Standing) अव्वल स्थान पटकावले आहे.  

टीम इंडियाला धक्क्यांवर धक्के; २२ वर्षानंतर चेन्नईत पराभव अन् गमावले जागतिक कसोटीतील अव्वल स्थान!

इंग्लंडच्या संघानं पहिल्या डावात ५७८ धावा चोपल्या. कर्णधार जो रुटनं द्विशतक झळकावलं, त्यानंतर भारताचा पहिला डाव ३३७ धावांवर गडगडला. इंग्लंडनं दुसऱ्या डावात १७८ धावा करून भारतासमोर ४२० धावांचे लक्ष्य ठेवले. आर अश्विननं दुसऱ्या डावात इंग्लंडच्या सहा फलंदाजांना बाद केले. भारताला दुसऱ्या डावात १९२ धावाच करता आल्या. शुबमन गिल व विराट कोहली यांची अर्धशतकी खेळी व्यर्थ ठरली. जॅक लिचनं चार, जेम्स अँडरसननं तीन विकेट्स घेतल्या. या विजयासह इंग्लंड ४४२ गुणांसह व ७०.२ टक्क्यांसह अव्वल स्थानी पोहोचला आहे. टीम इंडियाची थेट चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. तारे जमी पर!; टीम इंडियाचा इंग्लंडकडून दारूण पराभव

कसं असेल अंतिम सामन्याचं गणित 

भारताला क्वालिफाय होण्यासाठी 

  1. 2-1 असा विजय
  2. 3-1 असा विजय

 

इंग्लंडला क्वालिफाय होण्यसाठी

  1. ३-० असा विजय
  2. ३-१ असा विजय
  3. ४-० असा विजय

 

ऑस्ट्रेलिया होऊ शकते क्वालिफाय

  1. इंग्लंडनं मालिका १-० नं जिंकल्यास
  2. इंग्लंडनं मालिका २-०नं जिंकल्यास
  3. इंग्लंडनं मालिका २-१नं जिंकल्यास
  4. भारत-इंग्लंड मालिका १-१ बरोबरीत सुटल्यास 
  5. भारत-इंग्लंड मालिका २-२ बरोबरीत सुटल्यास 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा