भारताच्या गोलंदाजाची कमाल, 19 धावांत टिपले 7 फलंदाज; प्रतिस्पर्धी संघ 49 धावांत तंबूत

नवी दिल्ली : भारताच्या गोलंदाजानं विजय हजारे चषक वन डे क्रिकेट सामन्यात पंजाबकडून खेळताना विक्रमी कामगिरी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 09:46 AM2019-10-07T09:46:23+5:302019-10-07T09:46:50+5:30

whatsapp join usJoin us
Punjab bowler Sandeep Sharma has taken 7/19 in a Vijay Hazare Trophy match v Haryana | भारताच्या गोलंदाजाची कमाल, 19 धावांत टिपले 7 फलंदाज; प्रतिस्पर्धी संघ 49 धावांत तंबूत

भारताच्या गोलंदाजाची कमाल, 19 धावांत टिपले 7 फलंदाज; प्रतिस्पर्धी संघ 49 धावांत तंबूत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : भारताचा गोलंदाज संदीप शर्मानं विजय हजारे चषक वन डे क्रिकेट सामन्यात पंजाबकडून खेळताना विक्रमी कामगिरी केली. त्यानं हरयाणाच्या फलंदाजांना झटपट माघारी पाठवून संपूर्ण संघ 49 धावांत माघारी पाठवला. पंजाबने 50 धावांचे लक्ष्य 7 विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. पंजाबने 15.1 षटकांत 7 बाद 50 धावा केल्या. संदीपनं 19 धावांत 7 विकेट्स घेतल्या.

हरयाणाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा हा निर्णय चुकला. हरयाणाचा संपूर्ण संघ 16.1 षटकांत 49 धावांत तंबूत परतला. संदीपनं 8 षटकांत 19 धावांत 7 विकेट्स घेतल्या. संदीपनं 2.38च्या सरासरीनं गोलंदाजी केली आणि दोन निर्धाव षटकही टाकली. हरयाणाकडून नीतीन सैनीनं 22 आणि सुमित कुमारनं 13 धावांची खेळी केली. याशिवय अन्य फलंदाजांना पाच धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. सिद्धार्थ कौलनं तीन विकेट्स घेतल संदीपला साजेशी साथ दिली.

पंजाबला 50 धावांचे लक्ष्य पार करण्यासाठी चांगलाच घाम गाळावा लागला. पंजाबकडून सलामीवीर अभिषेक शर्माने सर्वाधिक 22 धावा केल्या. त्याच्या व्यतिरिक्त अन्य फलंदाजांना दुहेरी आकडा पार करता आला नाही. पंजाबनं कसेबसे हे लक्ष्य पार केले. हरयाणाच्या अजित चहलने 32 धावांत 4 विकेट्स,तर हर्षल पटेलने 12 धावांत 2 विकेट्स घेतल्या.
संदीपची ( 7/19) कामगिरी ही लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी ठरली. यात शाबाद नदीम (8/10) आणि आर संघवी ( 8/15) हे अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहेत.

इक्बाल अब्दुल्लाने 7 षटकात 4 धावा, 4 मेडन, 3 विकेट्स घेत मणिपूरची उडवली दाणादाण
विजय हजारे चषक स्पर्धेत सिक्कीम आणि मणिपूरचा सामना  शनिवारी रंगला होता. या सामन्यात सिक्कीम संघाकडून खेळताना इक्बाल अब्दुल्लाने अप्रतिम गोलंदाजी करत मणिपूरची दाणादाण उडवून दिली. सिक्कीम आणि मणिपूरमध्ये रंगणाऱ्या सामना  पावसामुळे 40 षटकांचा खेळविण्याचा निर्णय पंचांनी घेतला होता. या सामन्यात मणिपूरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सिक्कीमच्या भेदक गोलंदाजीसमोर मणिपूरचा संघ 120 धावातच गुंडळला. यावेळी सिक्कीम संघाकडून खेळणार डावखुरा फिरकीपटू इक्बाल अब्दुल्लाने सात षटकात अवघ्या 4 धावा देत चार मेडन टाकत 3 विकेट्स घेत मणिपूर संघाची दाणादाण उडवून दिली.  तसेच यशपाल सिंगने देखील 6.4 षटकात 22 धावा देत 4 विकेट्स घेतल्या.

तसेच सिक्कीम संघ धावांचा पाठलाग करताना मणिपूरच्या राजकुमार रेक्स सिंगच्या पहिल्या षटकातचं एकही न धावा करता 2 विकेट्स गमवल्याने सामन्यात रंगत आली होती. मात्र पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शेवटी पंचाना हा सामना रद्द करावा लागला. राजकुमार रेक्स सिंगने पहिल्या षटकात एकही धावा न देता दोन विकेट्स घेतल्या. या आधी देखील रेक्स सिंगने एका डावात 10 विकेट्स घेण्याचा विक्रम देखील आपल्या नावावर केला आहे.  

Web Title: Punjab bowler Sandeep Sharma has taken 7/19 in a Vijay Hazare Trophy match v Haryana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.