Join us  

Shahid Afridi, PSL 2022 : अरेरे... कोरोनातून सावरून मैदानावर उतरला शाहिद आफ्रिदी अन् पोराटोरांनी त्याची लावली वाट, Video

PSL2022 : Shahid Afridi is being punished on his return - दुसऱ्यांदा कोरोनावर मात करून मैदानावर परतलेल्या शाहिद आफ्रिदीसाठी पाकिस्तान सुपर लीगमधील ( PSL) पुनरागमन काही खास ठरले नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2022 9:55 PM

Open in App

PSL2022 : Shahid Afridi is being punished on his return - दुसऱ्यांदा कोरोनावर मात करून मैदानावर परतलेल्या शाहिद आफ्रिदीसाठी पाकिस्तान सुपर लीगमधील ( PSL) पुनरागमन काही खास ठरले नाही. कॉलिन मुन्रोसारखा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव असलेला खेळाडू सोडा, इथे आजम खान या पोरानं आफ्रिदीच्या गोलंदाजीची लक्तरे वेशीवर टांगली. २०व्या षटकात तर आजम खाननं तीन खणखणीत षटकार खेचून २० धावा चोपल्या. क्युएट्टा ग्लॅडिएटर्स संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आफ्रिदीला इस्लामाबाद युनायटेडच्या फलंदाजांनी धु धु धुतले. या सामन्यात आफ्रिदीच्या षटकात १६.७५च्या सरासरीने धावा कुटताना युनायटेडने २० षटकांत ४ बाद २२९ धावांचा डोंगर उभा केला.

प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या युनायटेडला पॉल स्टिर्लिंग व अॅलेक्स हेल्स यांनी ५५ धावांची सलामी दिली. हेल्स ९ चेंडूंत २२ धावा करून माघारी परतला. कर्णधार शादाब खान ( ९) आज अपयशी ठरला. स्टिर्लिंगने २८ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ५८ धावांची खेळी केली. त्यानंतर कॉलिन मुन्रो व आजम खान यांनी चौथ्या विकेटसाठी ९ षटकांत ९३ धावांची भागीदारी केली. या ९ षटकांत या दोघांनी आफ्रिदीचा पार पचका केला. तो टाकेल तो चेंडू सीमापार पाठवण्याचा सपाटाच या दोघांनी लावला.

या सामन्यात आफ्रिदी सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याच्या चार षटकांत ६७ धावा चोपल्या गेल्या. त्यानं टाकलेल्या २०व्या षटकात आजम खानने तीन षटकार खेचून २० धावा केल्या. अखेर आफ्रिदीला आजमची विकेट घेण्यात यश आले. आजमने ३५ चेंडूंत २ चौकार व ६ षटकारांसह ६५ धावा कुटल्या. मुन्रो ३९ चेंडूंत ३ चौकार व ५ षटकारांसह ७२ धावांवर नाबाद राहिला. या दोघांनी आफ्रिदीच्या गोलंदाजीवर ८ षटकार खेचले. याआधी मागच्या पर्वात झाफर गोहारने ४ षटकांत ६५ धावा दिल्या होत्या.  

टॅग्स :शाहिद अफ्रिदीपाकिस्तानटी-20 क्रिकेट
Open in App