Join us

पाकिस्तानी क्रिकेटपटूने लाईव्ह मॅचमध्ये सहकाऱ्याला दिली शिवी, नंतर तोंड लपवण्याची शोधावी लागली जागा, Video

पाकिस्तान सुपर लीगमध्ये ( PSL 8) रोज नवनवीन किस्से पाहायला मिळत आहेत. काल झालेल्या मुल्तान सुलतान्स विरुद्ध इस्लामाबाद युनायटेड यांच्यातल्या सामन्यात असाच प्रसंग घडला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 16:03 IST

Open in App

पाकिस्तान सुपर लीगमध्ये ( PSL 8) रोज नवनवीन किस्से पाहायला मिळत आहेत. काल झालेल्या मुल्तान सुलतान्स विरुद्ध इस्लामाबाद युनायटेड यांच्यातल्या सामन्यात असाच प्रसंग घडला. इस्लामाबाद युनायटेडचा कर्णधार शादाब खान ( shadab Khan) याने आपल्याच सहकाऱ्याला शिवी घातली. फलंदाजी करतानाही जेव्हा तो बाद झाला तेव्हाही मैदान सोडताना तो शिव्या देतच गेला. पण, त्यानंतर क्षेत्ररक्षण करताना सहकाऱ्यालाही शिवी दिली, पण त्यानंतर जे घडलं त्यामुळे त्याला तोंड लपवण्यासाठी जागा शोधावी लागली. 

प्रथम फलंदाजी करताना सुलतान्स संघाने ५ बाद २०५ धावा केल्या. शान मसूदने ५० चेंडूंत १२ चौकारांसह ७५ धावा केल्या. कर्णधार मोहम्मद रिझवानने १८ चेंडूंत ३३ धावा चोपल्या. पण, या दोघांपेक्षा वरचढ ठरला तो टीम डेव्हिड, त्याने २७ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह ६० धावांची खेळी केली आणि संघाला २०५ धावांपर्यंत पोहोचवले. प्रत्युत्तरात इस्लामाबाद युनायटेडची सुरुवात खराब झाली. रहमनुल्लाह गुर्बाज ( २५) व अॅलेक्स हेल ( १) हे सलामीवीर लगेच माघारी परतले. कॉलिन मुन्रो व कर्णधार शादाब खान यांनी संघर्ष केला. मुन्रो २१ चेंडूंत ४० धावा करून बाद झाला, तर शादाबने २५ चेंडूंत ४४ धावा केल्या. बाद झाल्यावर त्याने शिवी दिली. फहिम अर्शफने २६ चेंडूंत नाबाद ५१ धावा करून युनायटेडला २ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. १९.५ षटकांत युनायटेडने ८ बाद २०९ धावा करून बाजी मारली. त्याआधी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ या सामन्यातला नाही, परंतु यात शादाब सहकाऱ्याला शिवी देताना दिसतोय आणि नंतर त्याचाच पोपट झाला. प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज धाव घेत असताना युनायटेडच्या खेळाडूने नॉन स्ट्रायकर एंडला रन आऊटचा प्रयत्न करण्याएवजी स्ट्राइकर एंडला थ्रो केला. तेव्हा शाबाद त्याला शिव्या देताय की नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो का नाही केला. पण, खेळाडूने केलेला थ्रो अचूक बसला अन् स्ट्रायकर एंडचा फलंदाज रन आऊट झाला. हे समजताच शादाबला तोंड लपवावे लागले. समालोचकही जोरजोराने हसू लागले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :पाकिस्तान
Open in App