PSL 2026: पाकिस्तान सुपर लीग (PSL) मधील इस्लामाबाद युनायटेड संघाने इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रूकला आपल्या संघात सामील केले आहे. झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुजरबानी याने IPL मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा करार मिळाल्यानंतर PSL मधून माघार घेतली होती. त्याच्या जागी आता हॅरी ब्रूक संघात दाखल झाला आहे. विशेष म्हणजे ब्रूकवर IPL मध्ये दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
PSL मध्ये हॅरी ब्रूकचे पुनरागमन
हॅरी ब्रूक याची इस्लामाबाद युनायटेडने विदेशी खेळाडूच्या रिप्लेसमेंट म्हणून निवड केली आहे. तो कराची लेगपासून संघासाठी खेळणार आहे. ब्रूक याने यापूर्वीही पाकिस्तान सुपर लीगमध्ये चांगली कामगिरी केली असून, त्याची आक्रमक फलंदाजी नेहमी चर्चेत असते. त्यामुळे त्याच्या पुनरागमनामुळे PSL चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
IPL मध्ये 2 वर्षांची बंदी
हॅरी ब्रूक याच्यावर इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्ससोबत 6.25 कोटी रुपयांचा करार करूनही स्पर्धेतून माघार घेतली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला प्राधान्य द्यायचे, असे कारण त्याने सांगितले होते. मात्र BCCI च्या नियमानुसार लिलावात निवड झाल्यानंतर दुखापतीशिवाय स्पर्धेतून माघार घेतल्यास खेळाडूवर दोन वर्षांची बंदी घातली जाते. ब्रूकने दुसऱ्यांदा दिल्ली कॅपिटल्ससोबत करार तोडल्यामुळे त्याच्यावर 2026 आणि 2027 या दोन हंगामांसाठी बंदी घालण्यात आली आहे.
PSL मधील कामगिरी
हॅरी ब्रूक शेवटचा 2022 मध्ये पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळला होता. त्या हंगामात त्याने 10 सामन्यांमध्ये 264 धावा केल्या होत्या आणि एक शतकही झळकावले होते. त्यामुळे इस्लामाबाद युनायटेडसाठी तो महत्त्वाचा मॅच विनर ठरू शकतो.
Web Summary : Harry Brook, banned from IPL for two years after withdrawing from his Delhi Capitals contract, will play in PSL for Islamabad United. He replaced Blessing Muzarabani and previously excelled in the league in 2022.
Web Summary : दिल्ली कैपिटल्स के अनुबंध से हटने के बाद आईपीएल से दो साल के लिए प्रतिबंधित हैरी ब्रूक इस्लामाबाद यूनाइटेड के लिए पीएसएल में खेलेंगे। उन्होंने ब्लेसिंग मुजरबानी की जगह ली और पहले 2022 में लीग में उत्कृष्ट प्रदर्शन किया था।