Join us
Daily Top 2Weekly Top 5

PSL 2026: रडीचा डाव महागात पडला! बॉल टेम्परिंग प्रकरणात पाकिस्तानच्या स्टार खेळाडूवर बंदीची कारवाई

 कोणत्या सामन्यात नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 21:23 IST

Open in App

Fakhar Zaman Banned For Two Matches In PSL 2026  पाकिस्तान सुपर लीग (PSL 2026) स्पर्धेतील बॉल टेम्परिंगचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे. या प्रकरणात पाकिस्तानच्या स्टार फलंदाजावर बंदीची कारवाई करण्यात आली आहे. लाहोर कलंदर्स (Lahore Qalandars) विरुद्ध कराची किंग्स (Karachi Kings) यांच्यातील सामन्यादरम्यान अखेरच्या षटकात फखर झमान याने हातून मॅच निसटत असताना रडीचा डाव खेळला होता.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

पाकिस्तानी क्रिकेटवर बंदीची कारवाई

पाकच्या खेळाडूने जे कृत्य केले ते पंचांनी पकडले. एवढेच नाही तर मैदानातील त्याचा कारनामा कॅमेऱ्यात कैद झाला अन् याच पुराव्याच्या आधारावर त्याला दोषी ठरवण्यात आले. या प्रकरणात त्याच्यावर पाकिस्तान सुपर लीगमधील दोन सामन्यांवर बंदीची कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board)  निवेदन जारी करत ही माहिती दिली.

लेडी CM मरियम नवाज शरीफ यांच्यावरील 'त्या' ट्विटसाठी पाक क्रिकेटरला मोजावे लागले २ कोटी; नेमकं काय घडलं?

 PCB च्या नियमांचे उल्लंघन

PCB ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “फखर झमान याच्यावर  PSL मधील दोन सामन्यांसाठी बंदी घालण्यात आली आहे. लाहोर कलंदर्स आणि कराची किंग्स यांच्यातील सामन्यात त्याने कलम २.१४ चे उल्लंघन केले आहे.” सामनाधिकारी आणि श्रीलंकेचे माजी क्रिकेटर रोशन महानामा (Roshan Mahanama ) यांनी शिस्तभंग सुनावणी घेत सर्व पुरावे तपासल्यानंतर हा निर्णय दिला.

 सामन्यात नेमकं काय घडलं?

हा प्रकार सामन्याच्या दुसऱ्या डावात १९ व्या षटकाच्या अखेरीस घडला. शेवटच्या षटकात कराची फ्रँचायझी संघाला विजयासाठी १४ धावांची गरज होती. त्यावेळी फखर झमान लाहोर संघातील आपला सहकारी हॅरिस रौफ आणि कर्णधार शाहीन शाह आफ्रिदी यांच्यासोबत चर्चा करताना दिसून आले. चर्चेच्या बहाण्याने त्याने चेंडूशी छेडखानी केली. मैदानातील पंच फैसल आफ्रिदी यांना संशय आल्याने त्यांनी चेडू मागून तो तपासल्यावर हा सर्व प्रकार उघड झाला.  

अंपायरशी चर्चा आणि कारवाई

कर्णधार शाहीन आफ्रिदी आणि स्क्वेअर लेग अंपायर यांच्यात दीर्घ चर्चा झाली. त्यानंतर लाहोरच्या खेळाडूंनी मुद्दाम चेंडूशी छेडछाड केल्याचे आढळले. त्यानंतर संघावर ५ धावांची पेनल्टी ठोठावण्यात आली आणि चेंडू तात्काळ बदलण्यात आला. लाहोर कलंदर्सने हा सामनाही गमावला अन् आता रडीचा डाव खेळणाऱ्या फखर झमानला बंदीच्या स्वरुपात मोठी किंमत मोजावी लागली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : PSL 2026: Fakhar Zaman Banned for Ball Tampering in PSL!

Web Summary : Fakhar Zaman faces a two-match ban in PSL 2026 for ball tampering during a match between Lahore Qalandars and Karachi Kings. PCB penalized Zaman after umpires caught him altering the ball, leading to a five-run penalty and ultimately, a loss for Lahore.
टॅग्स :पाकिस्तान