Join us  

पाकिस्तानी खेळाडूंना मिळणार नारळ पाणी, गारेगार बनियान अन् बरंच काही; पण का?

PSLला यशस्वी करण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं ( PCB) कंबर कसली आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 2:47 PM

Open in App

पाकिस्तान सुपर लीगचे ( PSL) उर्वरित सामने जून महिन्यात अबुधाबी येथे खेळवण्यात येणार आहेत. यावेळी तेथील तापमान हे ४० डिग्री सेल्सियसच्या आसपास असेल. अशात खेळाडूंना गरमीपासून वाचवण्याचे आव्हान आयोजकांना पेलावे लागेल. PSLचे सामने २ जूनपासून सुरू होत आहेत आणि २० जूनला फायलन खेळवली जाणार आहे. मार्च महिन्यात कोरोना व्हायरसमुले PSL स्थगित करावी लागली होती. आता उर्वरित २० सामने जूनमध्ये खेळवण्यात येणार आहेत.

PSLला यशस्वी करण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं ( PCB) कंबर कसली आहे. त्यात खेळाडूंना गरमीपासून संरक्षण करण्यासाठी ते नारळ पाणी, बर्फाचे कॉलर व बनियान, आदी वस्तूंचा वापर करणार आहेत. तेथील गरमीमुळे खेळाडूंच्या प्रकृतीवर परिणाम होऊ नये, यासाठी PCB प्रयत्नशील असणार आहेत. पेशावर जाल्मीचे मुख्य प्रशिक्षक मोहम्मद अक्रम यांनी सांगितले की,''जूनमध्ये स्पर्धा खेळवणे अवघड आहे, परंतु अशक्य नाही. सर्व प्रकारच्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी आम्ही तयार आहोत. विशेष करून गोलंदाजांसाठी.''

त्यांनी सांगितले की,''शरिरातील तापमान कायम राखण्यासाठी आम्ही अधिकाधिक नारळ पाणी खेळाडूंना देणार आहोत. खेळाडूंना हायड्रेटेड ठेवणे आणि क्रँप पासून वाचवण्याची गरज आहे. अधिक सामने रात्री खेळवण्यात येणार असल्यानं आम्हाला हिट स्ट्रोकची भीती नाही. खेळाडूंसाठी गारेगार बनियानची सोय करण्याचा फ्रँचायझीचा प्रयत्न आहे. '' PSLचे सहा सामने दिवसा खेळवण्यात येणार आहेत. अशात खेळाडूंना गरमीचा त्रास होऊ शकतो.  

FULL LIST OF PSL 2021 REPLACEMENT DRAFT PICKS 

  • इस्लामाबाद युनायटेड ( Islamabad United) - उस्मान ख्वाजा ( अॅलेक्स हेल्स), जॅनेमन मलान ( लुईसल ग्रेगोरी)
  • कराची किंग्स ( Karachi Kings) - मार्टीन गुप्तील ( कॉलीन इंग्राम), थिसारा परेरा ( मोहम्मद नबी), नजीबुल्लाह झाद्रान ( डॅन ख्रिस्टीयन), लिटन दास ( जो क्लार्क)  
  • लाहोर कलंदर्स ( Lahore Qalandars) - शाकिब अल हसन ( राशिद खान), जेम्स फॉल्कनर ( डेव्हिड वीज), जो बर्न्स ( समित पटेल), कॅलम फर्ग्युसन ( टॉम अॅबेल), सीक्कूग प्रसन्ना ( जोए डेन्ली) 
  • मुल्तान सुल्तान ( Multan Sultans) - महमुदुल्लाह ( ख्रिस लीन), रहमनुल्लाह गुर्बाज ( जेम्स व्हिन्सी), जॉर्ज लिंडे ( अॅडम लिथ), ओबेड मॅकॉय ( कार्लोस ब्रेथवेट) 
  • पेशावर झाल्मी ( Peshawar Zalmi) - फॅबीयन अॅलन ( मुजीब उर रहमान), रोवमन पॉवेल ( लायम लिव्हिंगस्टोन), फिडेल एडवर्ड्स ( साकिब महमूद)  
  •  क्यूएत्ता ग्लॅडिएटर्स ( Quetta Gladiators) - आंद्रे रसेल ( टॉम बँटन)  
टॅग्स :पाकिस्तानसंयुक्त अरब अमिराती