Retirement: मोठी बातमी! इंग्लंड दौऱ्यापूर्वी आणखी एका भारतीय खेळाडूनं घेतली निवृत्ती

Priyank Panchal Retirement: इंग्लंड दौऱ्यापूर्वी एका भारतीय क्रिकेटपटूने निवृत्तीची घोषणा केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 18:53 IST2025-05-26T18:51:57+5:302025-05-26T18:53:28+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Priyank Panchal Announces Retirement From All Forms Of Cricket | Retirement: मोठी बातमी! इंग्लंड दौऱ्यापूर्वी आणखी एका भारतीय खेळाडूनं घेतली निवृत्ती

Retirement: मोठी बातमी! इंग्लंड दौऱ्यापूर्वी आणखी एका भारतीय खेळाडूनं घेतली निवृत्ती

आयपीएलनंतर भारतीय संघ इंग्लंड दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ इंग्लंडशी पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. याआधीच भारताचा क्रिकेटपटू प्रियांक पांचाळने सर्व प्रकारचया क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. पण त्याला भारतीय संघाकडून एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

प्रियांक पांचाळ हा घरगुती क्रिकेटमध्ये गुजरात संघाकडून खेळायचा. प्रियांकने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर गुजरात क्रिकेट असोसिएशनने त्याला शुभेच्छा दिल्या. गुजरात क्रिकेट असोसिएशनने आपल्या अधिकृत एक्स हँडलवरून केलेल्या पोस्टमध्ये असे लिहिली आहे की, हा एका युगाचा अंत आहे. प्रियांकने भारत अ आणि गुजरात संघाचे सर्व फॉरमॅटमध्ये नेतृत्व केले. आम्ही त्याच्या समर्पणाला सलाम करतो आणि त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.'

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी
प्रियांक पांचाळने २००८ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्याने १२७ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ८ हजार ८५६ धावा केल्या, ज्यात २९ शतके आणि ३४ अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट-ए मध्ये त्याच्या नावावर ३ हजार ६७२ धावांची नोंद आहे. २०१६-१७ मध्ये गुजरातला पहिले रणजी करंडक जिंकण्यास प्रियांक पांचाळने महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय, त्याने विजय हजारे ट्रॉफी (२०१५-१६) आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (२०१२-१३ आणि २०१३-१४) देखील जिंकली.

Web Title: Priyank Panchal Announces Retirement From All Forms Of Cricket