Join us
Daily Top 2Weekly Top 5

पृथ्वी शॉने असे दिले सचिन तेंडुलकरला उत्तर

पृथ्वीची तुलना मास्टर-ब्लास्टर सचिनशी केली जात आहे. पण या खेळीनंतर दस्तुरखुद्द सचिनने पृथ्वीला शुभेच्छा दिल्या. सामना संपल्यावर मात्र पृथ्वीने सचिनला आपल्या खास शैलीत उत्तरही दिले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 13:52 IST

Open in App
ठळक मुद्देपहिला दिवस संपल्यावर पृथ्वीची एक मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्याला सचिनने तुला नेमक्या कोणत्या शब्दांत शुभेच्छा दिल्या, असे दाखवण्यात आले.

मुंबई, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : पृथ्वी शॉने आपल्या पहिल्याच सामन्यात दमदार शतक झळकावले. त्यानंतर पृथ्वीवर जगभरातून कौतुकाचा वर्षा सुरु झाला. या खेळीनंतर पृथ्वीची तुलना मास्टर-ब्लास्टर सचिनशी केली जात आहे. पण या खेळीनंतर दस्तुरखुद्द सचिनने पृथ्वीला शुभेच्छा दिल्या. सामना संपल्यावर मात्र पृथ्वीने सचिनला आपल्या खास शैलीत उत्तरही दिले.

पहिला दिवस संपल्यावर पृथ्वीची एक मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्याला सचिनने तुला नेमक्या कोणत्या शब्दांत शुभेच्छा दिल्या, असे दाखवण्यात आले. त्यावर पृथ्वी म्हणाला की, " सचिन सर हे माझे आदर्श आहेत. मी लहान असताना त्यांनी मला बऱ्याचदा मार्गदर्शन केले. त्यांनी दिलेल्या टिप्सचा मला यापुढेही नक्कीच फायदा होईल."

टॅग्स :पृथ्वी शॉभारत विरुद्ध वेस्ट इंडिजसचिन तेंडुलकर