"हा सागरी किनारा…" God’s Plan कॅप्शनसह पृथ्वी शॉनं शेअर केली तिच्यासोबतच्या प्रेमाची खास गोष्ट

क्रिकेटरनं खास अंदाजात सांगितली तिच्यासोबतच्या भेटीमागची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 13:34 IST2026-01-09T13:31:31+5:302026-01-09T13:34:52+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Prithvi Shaw Viral Video With Rumoured Girlfriend Akriti Agarwal With Special Caption | "हा सागरी किनारा…" God’s Plan कॅप्शनसह पृथ्वी शॉनं शेअर केली तिच्यासोबतच्या प्रेमाची खास गोष्ट

"हा सागरी किनारा…" God’s Plan कॅप्शनसह पृथ्वी शॉनं शेअर केली तिच्यासोबतच्या प्रेमाची खास गोष्ट

भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉ हा क्रिकेटच्या मैदानातील कामगिरीशिवाय फिल्डबाहेरील गोष्टींमुळे चर्चत राहणारा चेहरा आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आयुष्यात नव्या गर्लफ्रेंडची एन्ट्री झाल्याची गोष्ट चर्चेत आहे. ही लव्हस्टोरी कशी सुरु झाली? दोघे एकमेकांना कसे भेटले? असे अनेक प्रश्न पृथ्वीच्या चाहत्यांच्या मनात होते. आता कथित गर्लफ्रेंडसोबतची सागरी किनाऱ्यावरील खास फ्रेम शेअर करत क्रिकेटरनं तिच्यावर प्रेम व्यक्त केले आहे. या फोटोसह पृथ्वीनं खास कॅप्शनसह आयुष्यभरासाठी दोघे एकत्र येणार असल्याची हिंटही दिल्याचे दिसते. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

पृथ्वीनं God’s Plan या खास कॅप्शनसह शेअर केली प्रेमाची गोष्ट

पृथ्वी शॉने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये तो एका  तरुणीसोबत दिसत आहे. ही तरुणी दुसरी कोणी नसून त्याची कथित गर्लफ्रेंड आकृती अग्रवाल असल्याचे दिसते. दोघेही समुद्रकिनारी फिरताना आणि बाल्कनीसारख्या ठिकाणी एकमेकांकडे प्रेमळ नजरेने पाहताना दिसतात. या फ्रेममध्ये दोघांच्यातील कमालीची केमिस्ट्री पाहायला मिळते. 

टीम इंडियातील ब्युटीनं स्वत:ला २-३ महिने एका खोलीत बंद करुन ठेवलं होतं; बुमराहचा खास उल्लेख करत म्हणाली...

क्रिकेटरनं खास अंदाजात सांगितली तिच्यासोबतच्या भेटीमागची गोष्ट

 "तुम्ही दोघे कसे भेटलात?" या प्रश्नाच उत्तर देताना पृथ्वीनं कॅप्शनमध्ये  God’s Plan असा उल्लेख केला आहे. देवानेच आमची जोडी बनवली आहे, असे सांगत क्रिकेटरनं आयुष्यभराच्या पार्टनरशिपसाठी सज्ज आहोत, याचे संकेत दिले आहेत. पृथ्वी शॉ याने याआधी गणेश चतुर्थीच्या दिवशी आकृतीसोबतचा खास फोटो शेअर केला होता. या फोटोसह त्याने प्रेमाची कबुलीच दिली होती. आता नव्या खास पोस्टसह त्याने हे नातं आणखी फुलवण्यासाठी तयार आहोत, असे म्हटले आहे. 

झोकात पदार्पण केल्यावर त्याची गाडी रुळावरुन घसरली, आता...

पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारताने २०१८ मध्ये अंडर-१९ विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. याच वर्षी वर्षी त्याने आयपीएलसह टीम इंडियात पदार्पण केले. पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या मोजक्या फलंदाजांमध्ये  त्याचा समावेश होता. पण कामगिरीतील सातत्याच्या अभावामुळे तो टीम इंडियाबाहेर पडला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचा संघ बदलून महाराष्ट्र संघाच्या ताफ्यात गेल्यावर तो पुन्हा एकदा रुळावर आल्याचे दिसते. गतवर्षी IPL मध्ये अनसोल्ड राहिल्यावर यंदाच्या मिनी लिलावात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने पुन्हा एकदा त्याच्यावर भरवसा दाखवला आहे.

 

Web Title : पृथ्वी शॉ ने आकृति अग्रवाल संग रिश्ते की पुष्टि की, बीचसाइड फोटो साझा की।

Web Summary : भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉ ने 'गॉड्स प्लान' कैप्शन के साथ बीचसाइड फोटो साझा करके आकृति अग्रवाल के साथ अपने रिश्ते की पुष्टि की। उन्होंने आजीवन प्रतिबद्धता का संकेत दिया, यह खुलासा करते हुए कि वे कैसे मिले और अपने प्यार का इजहार किया।

Web Title : Prithvi Shaw confirms relationship with Akruti Agarwal, shares beachside photo.

Web Summary : Indian cricketer Prithvi Shaw confirmed his relationship with Akruti Agarwal by sharing a beachside photo with a 'God's Plan' caption. He hinted at a lifelong commitment, revealing how they met and expressing his love.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.