Join us

मुंबईकर पृथ्वी शॉ ला अखेर सूर गवसला, रणजी करंडक सामन्यात ठोकलं दमदार शतक

Prithvi Shaw Century, Ranji Trophy:  भारतासाठी ५ कसोटी सामने खेळलेला मुंबईकर सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ रणजी ट्रॉफी २०२३-२४ मध्ये ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 14:20 IST

Open in App

Prithvi Shaw Century, Ranji Trophy:  भारतासाठी ५ कसोटी सामने खेळलेला मुंबईकर सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ रणजी ट्रॉफी २०२३-२४ मध्ये छत्तीसगडविरुद्ध दुसरा सामना खेळत आहे. त्याने बंगालविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्याच्या एका डावात ३५ धावा केल्या होत्या, मात्र त्यानंतर छत्तीसगड विरुद्धच्या पहिल्याच डावात त्याने दमदार फलंदाजी करत शतक ठोकले. रणजीच्या या मोसमातील पृथ्वी शॉ याचे हे पहिलेच शतक आहे. अनेक कठीण प्रसंगांना तोंड देत अखेर क्रिकेटच्या मैदानात तो लयीत परतला.

पृथ्वी शॉ चे कारकिर्दीतील तेरावे शतक

पृथ्वी शॉ काही काळ दुखापतीशी झुंजत होता आणि त्यामुळे सय्यद मुश्ताक अली टूर्नामेंट, विजय हजारे ट्रॉफी आणि या रणजी मोसमाच्या पूर्वार्धात मुंबईचे प्रतिनिधित्व करणे त्याला शक्य झाले नव्हते. पण स्पर्धेच्या उत्तरार्धात या शतकासह त्याने शानदार पुनरागमन केले. पृथ्वी शॉ च्या प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीतील हे १३वे शतक होते, जे ८०व्या डावात आले. छत्तीसगड विरुद्धच्या या सामन्याच्या पहिल्या डावात पृथ्वी शॉ ने १०१ पेक्षा कमी चेंडूत शतक ठोकले. त्यात २ षटकार आणि १३ चौकारांचा समावेश होता.

पृथ्वी शॉ टीम इंडियातून बरेच दिवस बाहेर

पृथ्वी शॉ बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. डिसेंबर २०२०मध्ये अडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला. ODI बद्दल बोलायचे झाले तर, त्याने भारतासाठी शेवटचा सामना २३ जुलै २०२१ रोजी श्रीलंकेविरुद्ध कोलंबो येथे खेळला. पृथ्वीने भारतासाठी आतापर्यंत ५ कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने शतकाच्या मदतीने ३३९ धावा केल्या आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या १३४ धावा आहे. ६ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने १८९ धावा केल्या आहेत आणि सर्वोत्तम धावसंख्या ४९ धावा आहे.

टॅग्स :रणजी करंडकमुंबईपृथ्वी शॉ