Join us

आयपीएलपूर्वी पृथ्वी शॉ होणार फिट

न्यूझीलंड दौऱ्यानंतर होणाऱ्या आयपीएलसाठी मात्र पृथ्वी फिट होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 20:17 IST

Open in App

मुंबई : दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही दौऱ्यांना भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ याला मुकावे लागले आहे. पण न्यूझीलंड दौऱ्यानंतर होणाऱ्या आयपीएलसाठी मात्र पृथ्वी फिट होणार आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये सराव करत असताना पृथ्वीला दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर स्वरुपाची होती. त्यामुळे पृथ्वीला मायदेशी पाठवण्यात आले. या दुखापतीमुळे पृथ्वीला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात एकही कसोटी सामना खेळता आला नव्हता.

याबाबत पृथ्वी म्हणाला की, " आता मी पूर्णपणे फिट झालो आहे. त्यामुळे आगामी आयपीएलमध्ये मी खेळणार आहे. दुखापतीतून मी आता पूर्णपणे सावरलो आहे आणि आता फिटनेसवर मेहनत घेत आहे. येत्या काही दिवसांमध्ये मी नक्कीच मैदानात दिसेन. " 

टॅग्स :पृथ्वी शॉआयपीएल