मुंबईच्या दिंडोशी सत्र न्यायालयाने सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सपना गिलने दाखल केलेल्या विनयभंग प्रकरणात क्रिकेटपटू पृथ्वी शॉला १०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरही नोटिशीला उत्तर न दिल्याने ही कारवाई करण्यात आली.
सपना गिलचा आरोप आहे की, २०२२ मध्ये अंधेरी येथील एका पबमध्ये सेल्फी काढण्यावरून झालेल्या वादानंतर पृथ्वी शॉ आणि त्याच्या मित्रांनी तिचा विनयभंग केला. त्या घटनेनंतर पृथ्वी शॉवर झालेल्या कथित हल्ल्याप्रकरणी गिलला अटक करण्यात आली होती.
जामिनावर सुटल्यानंतर, तिने शॉ आणि त्याचा मित्र आशिष यादव यांच्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल करण्यासाठी विमानतळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्यानंतर, गिलने महानगरदंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने सांताक्रूझ पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, न्यायालयाने अनेक वेळा आदेश देऊनही पृथ्वी शॉने आपली बाजू मांडली नाही. त्यामुळे, न्यायालयाने मंगळवारी त्याला १०० रुपयांचा दंड ठोठावला.