Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!

Prithvi Shaw Sapna Gill Case: सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सपना गिलने दाखल केलेल्या विनयभंग प्रकरणात क्रिकेटपटू पृथ्वी शॉला १०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 10:19 IST2025-09-10T10:16:23+5:302025-09-10T10:19:09+5:30

whatsapp join usJoin us
Prithvi Shaw Fined Rs100 By Mumbai Court For Failing To Reply In Sapna Gill Molestation Plea | Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!

Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबईच्या दिंडोशी सत्र न्यायालयाने सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सपना गिलने दाखल केलेल्या विनयभंग प्रकरणात क्रिकेटपटू पृथ्वी शॉला १०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरही नोटिशीला उत्तर न दिल्याने ही कारवाई करण्यात आली.

सपना गिलचा आरोप आहे की, २०२२ मध्ये अंधेरी येथील एका पबमध्ये सेल्फी काढण्यावरून झालेल्या वादानंतर पृथ्वी शॉ आणि त्याच्या मित्रांनी तिचा विनयभंग केला. त्या घटनेनंतर पृथ्वी शॉवर झालेल्या कथित हल्ल्याप्रकरणी गिलला अटक करण्यात आली होती. 

जामिनावर सुटल्यानंतर, तिने शॉ आणि त्याचा मित्र आशिष यादव यांच्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल करण्यासाठी विमानतळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्यानंतर, गिलने महानगरदंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने सांताक्रूझ पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, न्यायालयाने अनेक वेळा आदेश देऊनही पृथ्वी शॉने आपली बाजू मांडली नाही. त्यामुळे, न्यायालयाने मंगळवारी त्याला १०० रुपयांचा दंड ठोठावला.

Web Title: Prithvi Shaw Fined Rs100 By Mumbai Court For Failing To Reply In Sapna Gill Molestation Plea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.