Buchi Babu Trophy 2025 स्पर्धेतून "टायगर अभी जिंदा है..." शो दाखवून देणाऱ्या पृथ्वी शॉनं गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देताना आपल्या आयुष्यातील नव्या इनिंगची खास गोष्ट शेअर केली आहे. महाराष्ट्र संघाकडून दमदार कमबॅक केल्यावर पृथ्वी शॉनं सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आकृती अग्रवालसोबत गणेश चतुर्थी साजरी केली. क्रिकेटरनं सोशल मीडियावर जोडीनं फोटो शेअर करत चाहत्यांन गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृतीचा बंध
पृथ्वी शॉ हा मैदानातील चढ-उताराचा आलेख दाखवणाऱ्या कामगिरीशिवाय वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींमुळे चर्चेत राहणाऱ्या क्रिकेटरपैकी एक आहे. अभिनेत्री निधी तापडियासोबत खुल्लम खुल्ला प्रेम व्यक्त केल्यावर दोघांच्या नात्यात दूरावा आला. ही गोष्ट सोशल मीडियावर चांगलीच गाजली. आता एका बाजूला देशांतर्गत क्रिकेटमध्ये संघ बदलून नवी सुरुवात करणाऱ्या पृथ्वीनं दुसऱ्या बाजूला आयुष्यातील पार्टनर बदलून इथंही नवी सुरुवात केल्याची गोष्ट त्याने आकृतीसोबत शेअर केलेल्या फोटोतून दिसून येते.
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
संघर्षाचा सामना करत असताना त्याच्या आयुष्यात झाली आकृतीची एन्ट्री
पृथ्वी शॉ हा प्रतिभावंत क्रिकेटरपैकी एक आहे. पण गेल्या काही वर्षांत तो धावांसाठी संघर्ष करताना दिसतोय. आधी टीम इंडियातून पत्ता कट झाला, मग मुंबईच्या संघानेही त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. एवढेच नाही तर आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात त्याच्यावर अनसोल्ड राहण्याची वेळ आली. पुन्हा कमबॅकसाठी मेहनत घेत असताना आकृतीच्या रुपात त्याला आयुष्याची नवी पार्टनर मिळाली आहे, ही गोष्ट सातत्याने चर्चेत होती. पण दोघांनीही नात्यावर मौनच बाळगल्याचे पाहायला मिळाले. आता महाराष्ट्र संघात एन्ट्री मारल्यावर पृथ्वी ट्रॅकवर आलाय. दुसरीकडे आकृतीसोबतचा खास फोटो शेअर करुन न बोलता त्याने प्रेमाची कबुलीच दिल्याचे फोटोतून स्पष्ट होते.
जोडीच्या फोटोवर लाइक्स अन् कमेंट्सची 'बरसात'
आकृती अग्रवाल ही सोशल मीडियावरील लोकप्रिय चेहऱ्यांपैकी एक आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या रुपात तिने आपला एक वेगळा चाहतावर्ग कमावला आहे. इन्स्टाग्रामवर तिचे ३.३ मिलियन फॉलोअर्स आहेत. पृथ्वीसह आकृतीनंही गणपती बाप्पा मोरिया म्हणत क्रिकेटरसोबतचा पहिला फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. या जोडीच्या फोटोवर लाइक्स अन् कमेंट्सची बरसात होताना दिसत आहे.
Web Title: Prithvi Shaw Celebrates Ganesh Chaturthi With Rumoured Girlfriend And Social Media Influencer Akriti Agarwal Pics Goes Viral
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.