पृथ्वी सोशल मीडियावर होतोय ट्रोल; ज्याची तुलना क्रिकेटच्या देवाशी झाली, त्याला झालंय तरी काय?

prithvi shaw : सचिनच्या निवृत्तीनंतर चारच दिवसांनी पृथ्वीने शालेय क्रिकेटमध्ये विक्रमी खेळी केल्याने त्याची तुलना सचिनसोबत होऊ लागली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2020 06:01 AM2020-11-07T06:01:56+5:302020-11-07T06:02:27+5:30

whatsapp join usJoin us
prithvi shaw is becoming a troll on social media; What if he was compared to the god of cricket? | पृथ्वी सोशल मीडियावर होतोय ट्रोल; ज्याची तुलना क्रिकेटच्या देवाशी झाली, त्याला झालंय तरी काय?

पृथ्वी सोशल मीडियावर होतोय ट्रोल; ज्याची तुलना क्रिकेटच्या देवाशी झाली, त्याला झालंय तरी काय?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : २०१३ सालचा नोव्हेंबर महिना कोणताही क्रिकेटप्रेमी विसरु शकणार नाही. कारण याच महिन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने  क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेत २२ यार्डाच्या खेळपट्टीला अखेरचा नमस्कार केला होता. मात्र त्याच्या बरोबर चार दिवसानी मुंबई क्रिकेटमध्ये एक युवा तारा समोर आला आणि त्याची तुलना थेट क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरशी झाली. हा तारा होता पृथ्वी शॉ. त्याने शालेय क्रिकेटमध्ये तब्बल ५४६ धावांची विक्रमी खेळी करत सर्वांचे लक्ष वेधले होते. मात्र सध्या आयपीएलमध्ये खराब फॉर्ममध्ये असलेला हाच पृथ्वी टीकाकारांच्या टार्गेटवर आहे. 
सचिनच्या निवृत्तीनंतर चारच दिवसांनी पृथ्वीने शालेय क्रिकेटमध्ये विक्रमी खेळी केल्याने त्याची तुलना सचिनसोबत होऊ लागली. पृथ्वीने काही अंशी सचिनप्रमाणेच कामगिरी करताना रणजी आणि दुलीप ट्रॉफी स्पर्धेत पदार्पण करत शतक झळकावले आणि सचिनच्या विक्रमाची बरोबरी केली. याशिवाय २०१८ साली कसोटी पदार्पण करताना त्याने शतक झळकावत सचिनच्याही पुढचे पाऊल टाकले. त्यामुळे त्याच्याकडे भविष्यातील मोठा स्टार फलंदाज म्हणून पाहिले गेले. 
मात्र यंदाच्या आयपीएलमध्ये हाच स्टार फलंदाज फ्लॉप होताना दिसत असल्याने सोशल मीडियावर सध्या पृथ्वी ट्रोल होताना दिसत आहे. गुरुवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध पहिल्या क्वालिफायर लढतीतही पृथ्वी शून्यावर बाद झाला. काही सामन्यांचा अपवाद वगळता यंदाच्या मोसमात पृथ्वी अपयशी ठरला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये पृथ्वीने १३ सामने खेळताना १३६.५२च्या स्ट्राईक रेटने २२८ धावाच केल्या. 

Web Title: prithvi shaw is becoming a troll on social media; What if he was compared to the god of cricket?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.