Join us

प्रीव्ह्यू: आजचा सामना- दिल्ली- बँगलोर संघ वर्चस्वासाठी प्रयत्नशील

अहमदाबाद : गेल्या लढतीतील पराभव विसरून विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघ आयपीएलमध्ये बरोबरीच्या लढतीत मंगळवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 06:47 IST

Open in App

अहमदाबाद : गेल्या लढतीतील पराभव विसरून विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघ आयपीएलमध्ये बरोबरीच्या लढतीत मंगळवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध विजयी मार्गावर परतण्याच्या निर्धाराने उतरणार आहे.आरसीबीने गेल्या लढतीत चेन्नई सुपर किंग्सचा ६९ धावांनी पराभव केला होता. दुसऱ्या बाजूचा विचार करता रविवारी रात्री दिल्ली कॅपिटल्सने सनरायजर्स हैदराबादवर सुपर ओव्हरमध्ये मात केली.

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आरसीबीला मधल्या षटकातील उणिवा दूर कराव्या लागतील. आरसीबीला फॉर्मात असलेला सलामीवीर फलंदाज देवदत्त पडिक्कल (१७१ धावा) आणि कोहली (१५१ धावा) यांनी चांगली सुरुवात करून दिली आहे.  मधल्या फळीकडून मात्र या दोघांना सहकार्य लाभले नाही. 

आरसीबी डावखुरा फिरकीपटू शाहबाज अहमदला संधी देऊ शकते. दिल्ली संघाला सलामीवीर फलंदाज व स्पर्धेत सर्वाधिक धावा फटाकाविण्यात अव्वल स्थानी असलेल्या शिखर धवनकडून (२५९) फॉर्म कायम राखण्याची आशा असेल. सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉसुद्धा (१६६) मोठी खेळी करण्यास उत्सुक असेल.

टॅग्स :दिल्ली कॅपिटल्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर