लंडन - ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याचे मला समाधान आहे. खेळातील सततच्या दडपणात आपण स्वत:ला झोकून देत असल्याने दडपण अनेकदा असह्य होते,’ असे द.आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सने म्हटले.
मेमध्ये डिव्हिलियर्सने निवृत्ती जाहीर करताच क्रिकेट विश्वाला आश्चर्याचा धक्का बसला होता. तो म्हणाला, ‘मला खेळत नसल्याचे कधीही वाईट वाटले नाही, उलट निवृत्तीचा पूर्ण आनंद घेत आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना तो पुढे म्हणाला, ‘सतत कामगिरी करण्याचे दडपण असायचे. तुम्ही काही केले नाही तरी दडपण व संघ हरला तरी दडपण, हे नेहमीचे झाले होते. स्वत:च्या दडपणाव्यतिरिक्त चाहत्यांचे, देशाचे व प्रशिक्षकाचे दडपण असते. एक वेळ अशी येते की सर्व असह्य होऊन जाते.’
त्याचवेळी एबी डिव्हिलियर्स आपण आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळत राहणार, असेही स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)
निवृत्तीनंतर समाधानी
आंतरराष्टÑीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतर समाधान व्यक्त करीत आहात का, असे विचारताच तो म्हणाला, ‘होय, मी असमाधानी आहे असे कधीही म्हणणार नाही.घरापासून अनेक महिने दूर राहणारे आंतरराष्टÑीय खेळाडू दडपण नसल्याचे जेव्हा सांगतात, तेव्हा ते स्वत:शी व इतरांशी खोटे बोलतात, हे लक्षात घेतले पाहिजे.’