मालिका विजयाची तयारी सुरू

फिट एकादश खेळविण्याची आशा : भारताने केला कसून सराव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 01:59 AM2021-01-14T01:59:46+5:302021-01-14T02:00:13+5:30

whatsapp join usJoin us
Preparations for the series victory begin | मालिका विजयाची तयारी सुरू

मालिका विजयाची तयारी सुरू

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ब्रिस्बेन : जखमांनी त्रस्त असलेल्या भारतीय संघाने बुधवारी गाबा मैदानावर पहिल्या सत्रात कसून सराव केला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध उद्या, शुक्रवारी सुरू होत असलेल्या चौथ्या तसेच निर्णायक कसोटीत बाजी मारण्यासाठी फिट एकादश उतरविण्याच्या अपेक्षेने सर्व खेळाडू घाम गाळताना दिसले.
सिडनीत तिसऱ्या कसोटीदरम्यान पोटाचे स्नायू दुखावल्याने चौथ्या सामन्यात खेळू न शकणारा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा देखील सरावाच्या वेळी संघासोबत होता. रोहित शर्मा, शुभमान गिल, कर्णधार अजिंक्य रहाणे आणि अन्य खेळाडू सरावाच्या इराद्याने आले होते.

बुमराहने गोलंदाजी कोच भारत अरुण यांच्यासोबत सखोल चर्चा केली. बीसीसीआयने ट्वीटर हॅन्डलवर लिहिले, ‘सिडनीत शानदार कामगिरी केल्यानंतर पुन्हा एकजूट दाखविण्याची वेळ आली आहे. आम्ही गाबा येथे अखेरच्या कसोटी सामन्याची तयारी सुरू केली आहे.’ चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादव याने नेटमध्ये बराचवेळ गोलंदाजीचा सराव केला. अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे कुलदीपला संघात स्थान मिळण्याची शक्यता बळावली आहे.

भारतीय संघ जखमांमुळे त्रस्त आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेआधी ईशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमार जखमी होऊन बाहेर पडले. दौऱ्यात मोहम्मद शमी, उमेश यादव, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अनुमा विहारी हे सर्वजण जखमी होऊन बाहेर झाले, तर यष्टिरक्षक ऋषभ पंत हा देखील जखमी झाल्याने तिसऱ्या कसोटीत यष्टिरक्षण करू शकला नव्हता.

n वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर आणि अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर हे देखील सरावात सहभागी होते. बुमराहच्या जागी नटराजन किंवा शार्दुल यापैकी एकाला संधी मिळू शकते. मोहम्मद सिराज आणि नवदीप सैनी यांचा वेगवान मारा पूर्णपणे वेगळ्या स्वरूपाचा असेल. 
n मुख्य कोच रवी शास्त्री सरावाच्यावेळी खेळाडूंसोबत होतेे. त्यांनी प्रत्येक खेळाडूसोबत चर्चा केली. सहयोगी स्टाफमधील प्रत्येकाकडून त्यांनी माहिती घेतली. त्यात अरुण यांच्याशिवाय फलंदाजी कोच विक्रम राठोड आणि क्षेत्ररक्षण कोच आर. श्रीधर यांचा समावेश होता.

Web Title: Preparations for the series victory begin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.