Join us

कोरोना संकटाशी मुकाबला करणाऱ्या भारतीयांसाठी पाकिस्तानी कर्णधार बाबर आजमची प्रार्थना!

भारतात मागील ३-४ दिवसांत दररोज कोरोना रुग्णांची संख्या ३ लाखांच्या घरात वाढत आहे. याचा ताण आरोग्य यंत्रणेवर पपडताना पाहायला मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 07:45 IST

Open in App

भारतात मागील ३-४ दिवसांत दररोज कोरोना रुग्णांची संख्या ३ लाखांच्या घरात वाढत आहे. याचा ताण आरोग्य यंत्रणेवर पपडताना पाहायला मिळत आहे. रुग्णांना उपचारासाठी हॉस्पिटल, ऑक्सिजन मिळत नसल्याच्या बातम्या कानावर येत आहेत. भारतातील परिस्थिती पाहून जगभरातून सांत्वन केलं जात आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम यानंही ( Babar Azam) यानंही ट्विट करून भारतीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या. पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर आणि माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीनंही भारतीयांसाठी मदतीचं आवाहन केलं होतं.  

बाबर आजमनं ट्विट केलं की,''या संकटकाळात भारतातील लोकांसाठी मी प्रार्थना करतो. हा काळ एकजुटी दाखवण्याचा आणि प्रार्थना करण्याचा आहे. लोकांनी कोरोना नियमांचं पालन करावं, हे मी आवाहन करतो. आपली सुरक्षितता आपल्या हातात आहे आणि आपण सर्वांनी मिळून याचा सामना करू शकतो.''  बाबर आजमनं झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात विराट कोहलीचा सर्वात जलद २००० धावांचा विक्रम मोडला आहे. त्यानं ५२ डावांत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त २००० धावा केल्या, विराट कोहलीनं ५६ धावांत हा पल्ला गाठला होता. त्यानंतर अॅरोन फिंच - ६२ डाव, ब्रेंडन मॅक्युलम - ६६ डाव, मार्टिन गुप्तील - ६८ डाव व पॉल स्टीर्लिंग - ७२ डाव यांचा क्रमांक येतो.    

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यापाकिस्तान