IND vs AUS: टीम इंडियासाठी गूड न्यूज, चार महिन्यानंतर विस्फोटक फलंदाजाचं संघात कमबॅक!

Pratika Rawal: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन-डे मालिकेसाठी भारतीय महिला संघात स्टार फलंदाज प्रतीका रावलचे दणक्यात पुनरागमन झाले आहे. ४ महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आणि दुखापतीवर मात करून ही 'रन-मशीन' पुन्हा एकदा मैदानात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 12:29 IST2026-02-17T12:21:39+5:302026-02-17T12:29:38+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Pratika Rawal Returns to India Womens Squad for ODI Series Against Australia After Injury Layoff | IND vs AUS: टीम इंडियासाठी गूड न्यूज, चार महिन्यानंतर विस्फोटक फलंदाजाचं संघात कमबॅक!

IND vs AUS: टीम इंडियासाठी गूड न्यूज, चार महिन्यानंतर विस्फोटक फलंदाजाचं संघात कमबॅक!

भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या महत्त्वाच्या दौऱ्यावर असून, एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय संघासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारताची युवा आणि स्फोटक फलंदाज प्रतीका रावल दुखापतीतून पूर्णपणे सावरली असून, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी तिची भारतीय संघात निवड करण्यात आली.

प्रतीका रावल गेल्या चार महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर होती. २६ ऑक्टोबर २०२५ रोजी आयसीसी महिला विश्वचषकादरम्यान बांगलादेशविरुद्ध फिल्डिंग करताना तिला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तिने बंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पुनर्वसन पूर्ण केले. वैद्यकीय चाचण्यांनंतर बीसीसीआयने तिला पूर्णपणे तंदुरुस्त घोषित केले असून, आता ती कांगारूंच्या देशात आपला जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे.

प्रतीकाचे पुनरागमन भारतीय फलंदाजीसाठी बूस्टर ठरणार आहे. डिसेंबर २०२४ मध्ये पदार्पण केल्यापासून तिने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपली छाप पाडली. प्रतिका रावलने २४ एकदिवसीय सामन्यात ५० पेक्षा अधिक सरासरीने १ हजार ११० धावा केल्या आहेत, ज्यात दोन शतक सात अर्धशतकांचा समावेश आहे. 

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय एकदिवसीय संघ:

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृति मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, रेणुका ठाकुर, श्री चरणी, वैष्णवी शर्मा, क्रांति गौड, स्नेह राणा, दीप्ति शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), उमा छेत्री (विकेटकीपर), काश्वी गौतम, अमनजोत कौर, जेमिमा रोड्रिग्स, हरलीन देओल आणि प्रतिका रावल.

Web Title : भारत के लिए खुशखबरी: विस्फोटक बल्लेबाज प्रतिका रावल की वापसी!

Web Summary : चोट से उबरकर प्रतिका रावल ऑस्ट्रेलिया दौरे के लिए भारत की वनडे टीम में वापस आ गई हैं। विश्व कप के दौरान लगी चोट के कारण चार महीने के ब्रेक के बाद, विस्फोटक बल्लेबाज भारत की बल्लेबाजी को बढ़ावा देने के लिए तैयार है, जिसने 24 वनडे में 1110 रन बनाए हैं।

Web Title : Good News for India: Explosive Batter Pratika Rawal Returns!

Web Summary : Pratika Rawal, recovered from injury, is back in India's ODI squad for the Australia tour. After a four-month absence due to injury sustained during the World Cup, the explosive batter is set to boost India's batting lineup, having scored 1110 runs in 24 ODIs.