Pratika Rawal Finally Gets Her World Cup Winners' Medal : भारताची सलामीची बॅटर प्रतीका रावलला हिला अखेर २०२५ महिला क्रिकेट विश्वचषक विजेतेपदाच्या संघाला दिले जाणारे पदक मिळालं आहे. यंदाच्या हंगामात प्रतीका रावल ही भारतीय संघाचा प्रमुख भाग होती. तिने लक्षवेधी कामगिरीही केली. पण साखळी फेरीतील बांगलादेशविरुद्धच्या अखेरच्या लढतीत ती दुखापतग्रस्त झाली. परिणामी १५ सदस्यीय संघातून ती बाहेर पडली. तिच्या जागी भारतीय संघात शफाली वर्माची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली होती.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाली, पण पदक मिळाले नव्हते
आयसीसीच्या नियमानुसार, सूपर्ण स्पर्धेचा भाग असलेल्या खेळाडूंनाच जेतेपदानंतर पदक दिले जाते. त्यामुळेच नवी मुंबईच्या मैदानात भारतीय संघाने विश्वविजेतेपद पटकावल्यावर ती संघाबोत दिसली, पण तिच्या गळ्यात विश्वविजेतेपदाचा दागिना दिसला नव्हता. पण आता ICC नं नियमात बदल करुन भारताच्या लेकीला तिच्या हक्काचा दागिना अर्थात अन्य खेळाडूंप्रमाणे तिलाही पदक प्रदान करण्यात आलं आहे.
भारतीय महिला संघाकडून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना स्पेशल गिफ्ट; मेडलसंदर्भातील 'तो' संभ्रमही दूर
PM मोदींच्या भेटीआधीच देण्यात आलं पदक
प्रतीका रावलचे वडील आणि बीसीसीआय लेव्हल १ अंपायर असलेल्या प्रदीप रावल यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीममध्ये आपल्या लेकीला विश्वविजेत्या महिला संघाला दिले जाणारे पदक मिळाल्याची पुष्टी केली. आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांच्या पुढाकार घेतल्याची गोष्ट शेअर करताना ते म्हणाले की, प्रतीकाला पदक मिळेल, यासंदर्भात जय शाह यांनी मेसेजवरून माहिती कळवली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीआधीच प्रतीकाला पदक मिळाले.
पहिल्यांदा वर्ल्ड कप खेळताना सोडली खास छाप
विश्वविजेत्या भारतीय संघाने नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. या भेटीतील फोटोमध्ये प्रतीका रावल हिच्या गळ्यात पदक दिसून आले. स्पर्धेतील तिच्या कामगिरीसंदर्भात बोलायचं ७ सामन्यातील ६ डावांत तिने ३०८ धावा केल्या. पहिल्यांदा वर्ल्ड कप स्पर्धा खेळथाना तिने एक शतकही झळकावले होते.
असं पहिल्यांदाच घडलं
ICC च्या नियमांनुसार फक्त अंतिम १५ खेळाडूंच्या यादीतील सदस्यांनाच अधिकृत विजेतेपदाचं पदक दिलं जातं. २००६ च्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघाने जेतेपद पटकावले होते. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज जेसन गिलेस्पी दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर पडला. परिणामी संघाला जेतेपद मिळूनही त्याला पदक मिळाले नव्हते. पण प्रतीका रावल हिला विशेष परवानगीने पदक देण्यात आले आहे. त्यामुळे ICC स्पर्धेत अंतिम १५ मध्ये नसूनही पदक मिळालेली ती पहिली क्रिकेटर ठरली. ICC नं नियम बदलल्यासंदर्भातील कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण हा नियम बाजूला ठेवून ठेवून अपवादात्मक परिस्थितीत प्रतीकाला विशेष सन्मान देण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते.