इंडियन प्रीमियर लीग २०२६ च्या मिनी लिलावात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने ज्या अनकॅप्ड खेळाडूवर भरवसा दाखवला त्याने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या सामन्यात गोलंदाजीत चमक दाखवली. देशांतर्गत प्रतिष्ठित स्पर्धेतील पहिल्या दिवशी जिथं फलंदाजांनी हवा केली त्या गर्दीत प्रशांत वीर हा CSK चा हिरा चमकला. चेन्नईच्या संघाने मिनी लिलावात प्रशांत वीरसाठी १४ कोटी २० लाख एवढी विक्रमी बोली लावली होती.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
IPL लिलावातील महागड्या अनकॅप्ड खेळाडूचे विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत दमदार पदार्पण
आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावात सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरलेल्या प्रशांत वीर याने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत २४ डिसेंबरला लिस्ट ए क्रिकेटमध्ये पदार्पण केले. उत्तर प्रदेशच्या संघाकडून खेळताना त्याने हैदराबादच्या संघाविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात ३ विकेट्स घेतल्या. त्याच्या कामगिरीच्या जोरावर उत्तर प्रदेशच्या संघाने पहिल्या सामन्यात ८४ धावांनी विजयही नोंदवला.
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
२० वर्षीय प्रशांतची कमाल! ३ पैकी दोन फलंदाजांना केलं क्लीन बोल्ड
डावखुऱ्या हाताच्या २० वर्षीय फिरकीपटूनं पदार्पणाच्या सामन्यात ३ पैकी २ फलंदाजांना क्लीन बोल्ड केल्याचे पाहायला मिळाले. UP टी-२० लीगमध्ये धमक दाखवल्यानंतर त्याला प्रतिष्ठित देशांतर्गत एकदिवसीय प्रकारातील विजय हजारे स्पर्धेत उत्तर प्रदेशच्या संघाकडून संधी मिळाली. १० षटकांच्या कोट्यात ४७ धावा खर्च करून त्याने ३ विकेट्स घेत पदार्पणाचा सामना खास केला. गोलंदाजीशिवाय या युवा खेळाडूमध्ये मोठी फटकेबाजी करण्याची क्षमताही आहे. पण पदार्पणाच्या सामन्यात त्याला फलंदाजीत पुरेशी संधी मिळाली नाही. ४ चेंडूत ७ धावा करून तो नाबाद राहिला.
उत्तर प्रदेशकडून कॅप्टन रिंकू सिंहसह चौघांची अर्धशतके
उत्तर प्रदेशच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना गोस्वामी ८१ (८१), आर्यन जुयाल ८० (९६), ध्रुव जुरेल ८० (६१), आणि कर्णधार रिंकू सिंह ६७(४८) या चौघांच्या अर्धशतकाच्या जोरावर ३२४ धावा करत हैदराबादसमोर ३२५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ २४० धावांत आटोपला.