SRH vs RR Praful Hinge Dream Debut IPL 2026 : सनरायझर्स हैदराबादच्या संघाकडून पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या विदर्भकर प्रफुल हिंगे याने राजस्थान रॉयल्सविरुद्ध दमदार पदार्पण केले. ज्या वैभव सूर्यवशीनं यंदाच्या हंगामात जसप्रीत बुमराह, जोश हेडलवूड आणि भुवनेश्वर कुरमारची धुलाई केली त्याला प्रफुल हिंगे याने आपल्या पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर शून्यावर बाद केले. चौथ्या चेंडूवर त्याने कमालीच्या फॉर्ममध्ये असलेल्या ध्रुव जुरेलला खातेही न उघडता माघारी धाडले. आपल्या पदार्पणाच्या सामन्यातील अखेरच्या चेंडूवर लुआन-ड्रे प्रीटोरियस याची विकेट घेत त्याने ओव्हर हॅटट्रिकचा डाव साधला. IPL च्या पदार्पणात पहिल्याच षटकात तीन विकेट घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे.
आधी ईशान किशनने फसवलं, भरवसा दाखवताच प्रफुलनं दाखवली गोलंदाजीतील धार
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात इम्पॅक्ट प्लेयरच्या यादीत असलेल्या प्रफुल हिंगे याला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेणार असे ईशान किशन याने सांगितले होते. पण या सामन्यात जयदेव उनाडकटवरच भरवसा दाखवण्यात आला. अखेर सनरायझर्स विरुद्धच्या सामन्यात प्रफुल याला IPL पदार्पणाची संधी मिळाली. ईशान किशन याने यावेळी डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी त्याच्यावर टाकली. या पठ्ठ्यानं पहिल्या चेंडूवर यशस्वी जैस्वाल याला एक धाव दिली. त्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर त्याने वैभव सूर्यवंशीची विकेट घेत IPL मध्ये पहिल्या विकेटचं खाते उघडले. याच षटकात आणखी दोन विकेट्स घेत आयपीएलच्या १९ व्या वर्षात पदार्पणात पहिल्या षटकात ३ विकेट्स घेण्याचा महारेकॉर्ड त्याने आपल्या नावे केला. यंदाच्या हंगामात वैभव सूर्यवंशी हा सर्वात लक्षवेधी आणि चर्चेित चेहरा राहिला आहे. या सामन्यातही पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या होत्या. पण पहिल्याच षटकात प्रफुल पटेल IPL च्या नव्या हिरोच्या रुपात चर्चेत आला आहे.
कोण आहे Praful Hinge? ज्याने टेबल टॉपर RR विरुद्ध केली हवा
प्रफुल हिंगे याचा जन्म १८ जानेवारी २००२ मध्ये नागपूर येथे झाला. २४ वर्षीय उजव्या हाताचा गोलंदाज देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भ संघाचे प्रतिनिधीत्व करतो. फक्त १० प्रथम श्रेणी सामन्यात ३० विकेट्स घेत त्याने आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. यंदाच्या आयपीएल हंगामाआधी झालेल्या मिनी लिलावात सनरायझर्स हैदराबादच्या संघाने ३० लाख या मूळ किंमतीसह त्याला आपल्या संघात सामील करून घेतले होते. काव्या मारनची ही शॉपिंग स्वस्तात मस्त ठरल्याचे पाहायला मिळाले.