भारतीय क्रिकेट संघाबरोबर सराव ते लॉर्ड्सवरचा बॉलबॉय, असा सुरु आहे त्याचा प्रवास

तो कधी भारतीय क्रिकेट संघाबरोबर सराव करतो, तर कधी लॉर्ड्सवर बॉलबॉयही होतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2018 20:34 IST2018-08-10T20:32:21+5:302018-08-10T20:34:45+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
practice with Indian cricket team to ball boy at lords | भारतीय क्रिकेट संघाबरोबर सराव ते लॉर्ड्सवरचा बॉलबॉय, असा सुरु आहे त्याचा प्रवास

भारतीय क्रिकेट संघाबरोबर सराव ते लॉर्ड्सवरचा बॉलबॉय, असा सुरु आहे त्याचा प्रवास

ठळक मुद्देसध्याच्या घडीला तो क्रिकेट जगतामध्ये सेलिब्रेटी ठरत आहे.

लंडन : सध्याच्या घडीला भारतातील एक मुलगा चांगलाच प्रकाशझोतात आहे. तो कधी भारतीय क्रिकेट संघाबरोबर सराव करतो, तर कधी लॉर्ड्सवर बॉलबॉयही होतो. त्यामुळे सध्याच्या घडीला तो क्रिकेट जगतामध्ये सेलिब्रेटी ठरत आहे.

भारताच्या 19-वर्षांखालील संघात खेळण्याची त्याला संधी मिळाली होती. त्यानंतर तो थेट इंग्लंडला रवाना झाला. तिथे त्याला भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्री यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली आणि मुरली विजय यांना त्याने सरावादरम्यान गोलंदाजी केली. आता तर तो भारत आणि इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्सवर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बॉलबॉय म्हणून काम करत आहे. आता एवढी माहिती सांगितल्यावर तो मुलगा कोण, हे तुम्हाला कळले असेलंच. तो मुलगा आहे भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा पूत्र अर्जुन.


Web Title: practice with Indian cricket team to ball boy at lords

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.