Join us

कोरोनामुळे दौरा सोडून मायदेशी परतण्याचा इंग्लंड क्रिकेट संघाचा निर्णय! 

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर इंग्लंड क्रिकेट संघाने श्रीलंका दौरा पुढे ढकलून मायदेशात परतण्याचा निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 19:03 IST

Open in App

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर इंग्लंड क्रिकेट संघाने श्रीलंका दौरा पुढे ढकलून मायदेशात परतण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडचा संघ दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर आला होता. पण खेळाडूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने इंग्लंड क्रिकेट बोर्डाने हा निर्णय घेतला. यासंदर्भात त्यांनी श्रीलंका क्रिकेटमंडळाशी चर्चा केली.

"सध्याच्या परिस्थितीत खेळाडूंचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आम्ही त्यांना लवकरात लवकर त्यांच्या कुटुंबीयांकडे पोहचवण्याच्या प्रयत्नात आहोत. सद्यस्थितीतीत क्रिकेटपलीकडे विचार करणे गरजेचे आहे," असे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे. 

त्यांनी श्रीलंका क्रिकेट मंडळाचे आभार मानले आहेत.

टॅग्स :कोरोनाइंग्लंडश्रीलंका