Join us

धोनी, कोहली अन् इतर खेळाडूंनी मतदानासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्याचा मोदींचा आग्रह

लोकसभेच्या 543 जागांसाठी देशभरात सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 15:25 IST

Open in App

मुंबई :  लोकसभेच्या 543 जागांसाठी देशभरात सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. 11 एप्रिल ते 19 मे दरम्यान मतदान होईल आणि 23 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. 11 एप्रिल, 18 एप्रिल, 23 एप्रिल आणि 29 एप्रिल अशा चार टप्प्यांमध्ये राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघ विभागण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीला एका महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या निवडणुकीत मोठ्या संख्येनं मतदान व्हावे यासाठी कंबर कसली आहे. नागरिकांनी मतदानाचा हक्क पार पाडावा यासाठी महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांनी आवाहन करावे, असा आग्रह मोदींनी धरला आहे. त्यांनी सोशल मीडियावर तसे ट्विट केले आहे. पाहा ट्विट...    

टॅग्स :लोकसभा निवडणूकविराट कोहलीमहेंद्रसिंग धोनी