Join us  

वार्नर-स्मिथनंतर 'या' खेळाडूने केली चेंडूशी छेडछाड; काय मिळाली शिक्षा, जाणून घ्या...

एका खेळाडूने चेंडूशी छेडछाड केल्याची घटना घडली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2019 4:04 PM

Open in App

मुंबई : ऑस्ट्रेलियाचे डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्हन स्मिथ हे चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी दोषी आढळले होते. त्यांच्यावर एका वर्षाची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही गोष्ट चाहते विसरले नसतानाच एका खेळाडूने चेंडूशी छेडछाड केल्याची घटना घडली आहे.

दक्षिण आफ्रिकेतील कसोटी सामन्यात चेंडूशी छेडछाड झाल्याचे पाहायला मिळाले होते. यामध्ये वॉर्नर आणि स्मिथ हे दोषी आढळले होते आणि त्यांच्यावर एका वर्षाची बंदी घालण्यात आली होती. त्याचबरोबर त्यांना कर्णधारपदी पुन्हा विराजमान होता येणार नाही. आता एका सामन्यात एका खेळाडूने चेंडूशी छेडछाड केल्याचे पाहायला मिळाले आहे.

आता हा खेळाडू कोण, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. हा खेळाडू पाकिस्तानचा आहे. एका स्थानिक सामन्यात अहमद शहजाद हा चेंडूशी छेडछाड केल्याचे पाहायला मिळाले आहे. सेंट्रल पंजाब आणि सिंधू या संघांमध्ये एक सामना खेळवला गेला. त्यामध्ये शहजाद चेंडूशी छेडछाड केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाले त्याच्या सामन्याच्या मानधनातून 50 टक्के रक्कम दंड स्वरुपात कापण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :चेंडूशी छेडछाडडेव्हिड वॉर्नरस्टीव्हन स्मिथपाकिस्तान