Join us

“माझ्या एका तरी बॉलला बॅट लावून दाखव, अशा प्रत्येक बॉलमागे एक बाईक दान देईन,’’ शोएब अख्तरने दिले आव्हान 

Shoaib Akhtar News: ट्विटरवरून दिलेल्या आव्हानामुळे शोएब अख्तर चर्चेत आला आहे. शोएबने दिलेल्या या आव्हानाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 14:53 IST

Open in App

इस्लामाबाद - रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रसिद्ध झालेला पाकिस्तानचा द्रुतगती गोलंदाज  शोएब अख्तरआंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन अनेक वर्षे झाली आहेत. मात्र आक्रमक वक्तव्ये आणि वादविवाद यामुळे तो नेहमीच चर्चेत असतो. आता ट्विटरवरून दिलेल्या आव्हानामुळे शोएब अख्तर चर्चेत आला आहे. शोएबने दिलेल्या या आव्हानाची पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. 

काही दिवसांपूर्वी शोएब अख्तरने पाकिस्तानी अभिनेता फहाद मुस्तफा याला आव्हान दिले होते. मुस्तफाने माझ्या गोलंदाजीवर सहा चेंडू खेळून दाखवावेत. तसे केल्यास मी त्याला एक मोटारसायकल बक्षीस म्हणून देईन. 

फहाद मुस्तफाने आतापर्यंत शोएबच्या या आव्हानावर उत्तर दिलेले नाही. मात्र पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे माजी विशेष सहाय्यक सय्यद जुल्फिकार बुखारी यांनी या वादात उडी घेतली आहे. बुखारी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर लिहिले की, ते शोएबचे आव्हान स्वीकारण्यास तयार आहेत.

दरम्यान, बुखारी यांनी आव्हान स्वीकारण्याचे संकेत दिल्याने शोएब अख्तरला आश्चर्याचा धक्का बसला आहे. एक चॅलेंजर अजून आला आहे. सगळं व्यवस्थित ना? अशी विचारणा शोएबने केली आहे.  

बुखारी यांनी या ट्विटला ट्वीटवरूनच उत्तर दिले आहे. मित्रा सर्व काही ठीक आहे. जर मी शोएबचा एक चेंडू जरी मिस केला, तरी अशा प्रत्येक चेंडूवर मी एक मोटारसायकल दान देईन..

 या जुगलबंदीमध्ये शोएब अख्तरच्या पुढच्या ट्विटनंतर अजून एक वळण आले. ही चर्चा आता गंभीर होत चालली आहे. असं असेल तर तुम्ही ज्या चेंडूला टच कराल अशा प्रत्येक चेंडू मागे मी एक बाईक दान देईन, असे प्रतिआव्हान शोएब अख्तरने दिले. 

शोएबने बुखारींकडे ते हे आव्हान कधी स्वीकारणार अशीही विचारणा केली. मात्र बुखारी यांनी शोएबच्या या ट्विटवर उत्तर दिलेले नाही. आता पाकिस्तानमधील सोशल मीडिया युझर्स शोएब आणि बुखारी यांच्यात हा सामना कधी रंगणार याबाबत चर्चा करत आहेत. 

टॅग्स :शोएब अख्तरआंतरराष्ट्रीय क्रिकेटपाकिस्तान