Join us

नव्या देशात जाण्यापूर्वी योजना आखतो : बुमराह

मी विदेश दौऱ्यावर जाताना केवळ क्रिकेटबाबत रणनीती तयार करीत नाही तर त्या देशातील विविध स्थळांना भेट देण्याची इच्छाही असते, असे मत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने व्यक्त केले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 23:44 IST

Open in App

लंडन : मी विदेश दौऱ्यावर जाताना केवळ क्रिकेटबाबत रणनीती तयार करीत नाही तर त्या देशातील विविध स्थळांना भेट देण्याची इच्छाही असते, असे मत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने व्यक्त केले.इंग्लंड दौºयातील दुसºया कसोटी सामन्याकरिता निवड होण्यासाठी उपलब्ध असलेल्या बुमराहच्या हवाल्याने त्याची आयपीएल फ्रेंचायसी मुंबई इंडियन्सने स्पष्ट केले की, ‘बुमराह विदेशातील प्रेक्षणीय स्थळांचा आनंद घेण्यास इच्छुक असतो. ते बघण्याची त्याची इच्छा असते. तेथील संस्कृती समजून घेण्याचा त्याचा कल असतो.’बुमराह म्हणाला, मी कुठल्याही देशाच्या दौºयावर जाताना योजना तयार करतो. त्या देशातील काही व्हिडीओ बघतो. प्रदीर्घ कालावधीच्या दौºयात या बाबी महत्त्वाच्या ठरतात. ‘कसोटी क्रिकेट खेळण्याची माझी सुरुवातीपासून इच्छा होती.ज्यावेळी मला दक्षिण आफ्रिकेत संधी मिळाली त्यावेळी आनंद झाला. सुरुवात चांगली झाली. कसोटी क्रिकेटचा दर्जा वरचा असून, माझ्या पसंतीचा विषय आहे.(वृत्तसंस्था)

टॅग्स :जसप्रित बुमराहभारतक्रिकेट