चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील या महत्त्वाच्या सामन्यात पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेकीवेळी चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने संघात एका बदलाची घोषणा केली. दुसरीकडे पंजाबच्या संघात कोणताही बदल करण्यात आला नाही. दरम्यान, दोन्ही संघाच्या प्लेईंग इलेव्हनवर एक नजर टाकुयात.
पंजाबने आपल्या पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव केल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाबने आपला संघ कायम ठेवला आहे. राजस्थानकडून मिळालेल्या पराभवानंतर चेन्नईला विजयाची नितांत गरज आहे. धोनीच्या दुखापतीमुळे आणि संघातील बदलांमुळे चेन्नईच्या रणनीतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नाणेफेकीनंतर बोलताना ऋतुराज गायकवाड म्हणाला की, "खेळपट्टी कोरडी दिसत आहे आणि त्यात फारसा बदल होईल असे वाटत नाही. एप्रिलची सुरुवात असल्याने दवाची अडचण येणार नाही. त्यामुळे फलंदाजी करून धावफलकावर मोठी धावसंख्या उभारणे आणि त्याचे रक्षण करणे हेच आमचे उद्दिष्ट असेल." गायकवाडने पुढे असेही नमूद केले की, "मागचा हंगाम कठीण होता, पण तो आता भूतकाळ आहे. प्रत्येक सामना नव्याने खेळणे हीच सीएसकेची ओळख आहे. मागील सामन्यात खेळलेल्या मॅट शॉर्टच्या जागी प्रशांत वीर याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे."
पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): प्रभसिमरन सिंग (पेड), कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, नेहल वढेरा, मार्कस स्टॉइनिस, मार्को जॅनसेन, झेवियर बार्टलेट, विजयकुमार विषक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.पंजाब किंग्ज इम्पॅक्ट सब्सिट्यूट: सूर्यांश शेडगे, प्रियांश आर्य, विष्णू विनोद, प्रवीण दुबे, हरप्रीत ब्रार
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन (विकेटकिपर), रुतुराज गायकवाड (कर्णधार), आयुष म्हात्रे, सर्फराज खान, शिवम दुबे, कार्तिक शर्मा, प्रशांत वीर, नूर अहमद, अंशुल कंबोज, मॅट हेन्री, खलील अहमद.चेन्नई सुपर किंग्ज इम्पॅक्ट सब्सिट्यूट: जेमी ओव्हरटन, राहुल चहर, मॅथ्यू शॉर्ट, रामकृष्ण घोष, गुर्जपनीत सिंग
Web Summary : Punjab won the toss, opting to bowl against Chennai. Chennai made one change, bringing in Prashant Veer. CSK aims for a big score, while Punjab seeks to continue their winning momentum.
Web Summary : पंजाब ने टॉस जीतकर चेन्नई के खिलाफ गेंदबाजी चुनी। चेन्नई ने एक बदलाव किया, प्रशांत वीर को शामिल किया। सीएसके का लक्ष्य बड़ा स्कोर बनाना है, जबकि पंजाब अपनी जीत की लय जारी रखना चाहता है।