फिजिओच्या चुकीने साहा अडचणीत

अंगठ्याच्या दुखापतीसाठी एनसीएमध्ये रिहॅबिलिटेशन कार्यक्रमात असलेला भारतीय कसोटी संघाचा यष्टीरक्षक रिद्धीमान साहा फिजियोच्या कथित चुकीमुळे दुखापतग्रस्त झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 02:35 IST2018-07-20T02:35:40+5:302018-07-20T02:35:53+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Physio misbehave in trouble | फिजिओच्या चुकीने साहा अडचणीत

फिजिओच्या चुकीने साहा अडचणीत

कोलकाता : अंगठ्याच्या दुखापतीसाठी एनसीएमध्ये रिहॅबिलिटेशन कार्यक्रमात असलेला भारतीय कसोटी संघाचा यष्टीरक्षक रिद्धीमान साहा फिजियोच्या कथित चुकीमुळे दुखापतग्रस्त झाला आहे. खांद्याला झालेल्या या दुखापतीमुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागेल. त्यानंतरही त्याच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘साहा येथे अंगठ्याच्या दुखापतीतून बरे होण्यासाठी आला होता. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये रिहॅबिलिटेशनमध्ये झालेल्या ही दुखापत झाली. साहाचे रिहॅबिलिटेशन चुकीच्या पद्धतीने करण्यात आले. एनसीएच्या फिजियोने मोठी चूक केली. आता शस्त्रक्रियेनंतरच तो खेळू शकतो. त्यानंतर तो दोन महिने बॅटला हातही लावू शकणार नाही. त्यानंतर त्याचे रिहॅबिलिटेशन सुरू होईल.’
साहाला आयपीएलमध्ये अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर तो खेळापासून दूर होता. मात्र आता लक्षात आले आहे की त्याची दुखापत मोठी आहे.
इंग्लंड विरोधातील आगामी कसोटी मालिकेसाठी त्याची निवड करण्यात आली नाही. मात्र बोर्डाने त्याच्या समस्येबाबत पूर्ण माहिती दिली नाही. खांद्याच्या दुखापतीमुळे तो भारतीय संघासोबत आॅस्ट्रेलिया दौºयावर जाऊ शकणार नाही.
साहाने टिष्ट्वट केले की,‘खूप वाईट काळ आहे.’ त्यासोबत त्याने आपल्या दमदार पुनरागमनाची आशाही व्यक्त केली. अधिकाºयाने दावा केला, साहाला दक्षिण आफ्रिका दौºयात एक झेल घेताना खांद्याची दुखापत झाली होती. ही किरकोळ दुखापत होती. मांस पेशीतील दुखापतीमुळे त्याला हा दौरा अर्धवट सोडावा लागला. त्या वेळी त्याच्या खांद्यात वेदना होत होत्या. यामुळे त्याला आयपीएलमध्ये फारसा त्रास झाला नाही.’
त्यांनी दावा केला की, ‘एनसीएत चांगल्या रिहॅबिलिटेशन केल्यानंतर तो इंग्लंड विरोधात खेळू शकतो. एनसीएमध्ये एका वरिष्ठ फिजियोच्या देखरेखीत प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्याची स्थिती आणखी खराब झाली.’ फिजियोने साहाला त्याच्या वास्तविक स्थितीबाबत माहिती दिली होती का यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या फिजिओने भारतीय संघासोबतही काम केले आहे. 

Web Title: Physio misbehave in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.