Join us

आयपीएलपेक्षा पीसीएलचे खेळाडूच भारी; पाकिस्तानच्या माजी खेळाडूचा जळफळाट

आयपीएलमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंन स्थान दिले जात नाही. त्यामुळे एका क्रिकेटपटूचा चांगलाच जळफळाट झालेला पाहायला मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 21:39 IST

Open in App

मुंबई : सध्याच्या घडीला क्रिकेट विश्वामध्ये बऱ्याच लीग आहेत, पण त्यामध्ये सर्वात धनाढ्य आणि ग्लॅमरसर लीग आहे ती आयपीएल.आयपीएलने देशालाही बरेच खेळाडू दिले आहे. पण या आयपीएलमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंन स्थान दिले जात नाही. त्यामुळे एका क्रिकेटपटूचा चांगलाच जळफळाट झालेला पाहायला मिळत आहे.

आयपीएलच्या सुरुवातीच्या हंगामात पाकिस्तानचे खेळाडू खेळले होते. त्याचबरोबर पाकिस्तानचे काही खेळाडू प्रशिक्षक आणि समालोकाचीही भूमिका बजावत होते. पण जेव्हा मुंबईत २००८ साली पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंना आयपीएलपासून लांब ठेवण्यात आले.

आयपीएलच्या धर्तीवर पाकिस्तानमध्येही लीग सुरु करण्यात आली. पाकिस्तान सुपर लीग, असे त्याचे नावही ठेवण्यात आले. पण या लीगची आणि आयपीएलची तुलनाच होऊ शकत नाही, असे बऱ्याच चाहत्यांचे म्हणणे आहे. आयपीएलमध्ये क्रिकेट विश्वातील सर्व देशांतील खेळायला उत्सुक असतात, पण पाकिस्तानमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव जास्त क्रिकेटपटू जातही नाहीत.

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अब्दुल रझाक याबाबत म्हणाला की, " आयपीएल आणि पाकिस्तान लीगमधील सर्वोत्तन खेळाडूंचे संघ बवनले. या दोन्ही संघांमध्ये सामना खेळवला गेला, तर आयपीएलवर पाकिस्तान लीगमधील खेळाडू भारी पडतील आणि ते सामनाही जिंकतील."

टॅग्स :आयपीएलपाकिस्तान