Join us
Daily Top 2Weekly Top 5

OMG: शाहिद आफ्रिदीला पाकिस्तान क्रिकेट मंडळ मोठा धक्का देणार?

इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघाला स्पॉन्सर्स मिळवणे अवघड जात होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 17:30 IST

Open in App

इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघाला स्पॉन्सर्स मिळवणे अवघड जात होते. पाकिस्तान क्रिकेट मंडळानं ( पीसीबी) ते मान्यही केलं होतं आणि स्पॉन्सर्ससाठी त्यांनी कराराची किंमत कमी करण्याचेही ठरवले होते. त्यांच्या मदतीसाठी माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीनं पुढाकार घेतला होता. त्यानं पाकिस्तान संघाच्या जर्सीवर शाहिद आफ्रिदी फाऊंडेशनचा लोगो लावण्याची परवानगी दिली होती. राष्ट्रीय संघाच्या जर्सीवर फाऊंडेशनचा लोगो, हे भाग्य असल्याचे आफ्रिदीनं ट्विट केलं होतं. पण, त्याचं हे स्वप्न तुटण्याची शक्यता आहे. पीसीबी आफ्रिदीला मोठा धक्का देऊ शकतात. 

Photo : 9 महिन्यांपूर्वी पत्नीला दिला घटस्फोट; आता एका मुलाच्या आईच्या प्रेमात पडला ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू!

पाकिस्तानात निगेटिव्ह अन् इंग्लंडमध्ये आढळला पॉझिटिव्ह; अन्य खेळाडूंवर कोरोना संकट!

पीसीबीला नवा स्पॉन्सर मिळणार आहे. पेप्सी या कंपनीनं पाकिस्तान क्रिकेट संघाचा प्रमुख स्पॉन्सरशीपचा करार वाढवला आहे. ट्रान्समीडिया ही एकमेव कंपनी त्यांच्यासोबत होती. त्याशिवाय अन्य स्पॉन्सर्ससोबतचा करार त्यांचा केव्हाच संपुष्टात आला आहे. ट्रान्समीडियानं पीसीबीला तीन वर्षांसाठी 270 कोटींची ऑफर दिल्याचे वृत्त आहे. 31 जून 2021पर्यंत पेप्सी पाकिस्तान संघाचा प्रमुख स्पॉन्सर असणार आहे. मागील दोन दशकांपासून पेप्सी पाकिस्तान संघाचा मुख्य स्पॉन्सर आहे. '' पेप्सी 1990पासून  पाकिस्तान संघाचे मुख्य पार्टनर आहेत. संघासोबत  त्यांच्या अनेक चांगल्या आठवणी आहेत आणि पुढील 12 महिने त्यांच्यासोबतचा करार वाढवला आहे'' असे पीसीबीचे कमर्शीयल डायरेक्टर बाबर हमीद यांनी सांगितले.   त्यामुळे पाकिस्तान संघ आता शाहिद आफ्रिदी फाऊंडेशचा लोगो जर्सीवर लावणार का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुख्य स्पॉन्सर म्हणून आता इंग्लंड दौऱ्यावर पेप्सीचे नाव दिसणार आहे.  पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात 5 ऑगस्टपासून मालिका सुरू होणार आहे. उभय संघांत तीन कसोटी व तीन ट्वेंटी-20 सामने होणार आहेत. तत्पूर्वी इंग्लंडचा संघ आयर्लंडविरुद्ध तीन वन डे सामने खेळणार आहे.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

गॅरी कर्स्टन यांच्यासाठी MS Dhoni नं घेतलेला आयोजकांशी पंगा अन्...

धक्कादायक; सौरव गांगुली होम क्वारंटाईन, कुटुंबातील आणखी एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह

स्विमर, वॉटर पोलो खेळाडू अन् वकील; जगातील स्फोटक फलंदाजाच्या पत्नीची चर्चा!

इंग्लंडची मोठी कारवाई; नियम मोडणाऱ्या गोलंदाजाला केलं संघाबाहेर 

स्टार मॉडलला आवडतो भारतीय क्रिकेटपटू; व्यक्त केली लग्न करण्याची इच्छा!

टॅग्स :शाहिद अफ्रिदीपाकिस्तान