Join us  

पाकिस्तानची लॉटरी; ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया व द. आफ्रिकेचे दिग्गज करणार मार्गदर्शन 

मागील ४-५ दिवसांत पाकिस्तान क्रिकेटमध्ये बराच गोंधळ पाहायला मिळला आहे. पण, आजचा दिवस हा पाकिस्तान क्रिकेटसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 3:46 PM

Open in App

मागील ४-५ दिवसांत पाकिस्तान क्रिकेटमध्ये बराच गोंधळ पाहायला मिळला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं ( PCB) आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ जाहीर करताच मुख्य प्रशिक्षक मिसबाह उल-हक आणि गोलंदाज प्रशिक्षक वकार युनिस यांनी राजीनामा दिला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. पण, आजचा दिवस हा पाकिस्तान क्रिकेटसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी अखेर माजी खेळाडू रमीज राजा ( Ramiz Raja) यांनी अधिकृत निवड झाली. १९९२च्या वर्ल्ड कप विजेत्या पाकिस्तानच्या संघाचे सदस्य असलेले राजा हे PCBचे ३६ वे अध्यक्ष आहेत. 

Big Breaking : विराट कोहलीची कर्णधारपदावरून गच्छंती?; BCCIनं सांगितलं टीम इंडियाचा कर्णधार कोण...

''जमैकात क्वारंटाईन कालावधीत मी मागील २४ महिन्यांचा आढावा घेतला आणि त्यावेळी हे बायो-बबलचे सत्र असेच सुरू राहणार असल्याचे मला जाणवले. त्यामुळे मला कुटुंबियांना पुरेसा वेळ देता येणार नाही, त्यांना वेळ देता यावा याकरिता मी राजीनामा देत आहे,''असे मिसबाह उल हकनं सांगितलं होतं. 

Pakistan T20 World Cup squad : शोएब मलिकला वर्ल्ड कप संघातून डच्चू; मुख्य प्रशिक्षकासह, गोलंदाजी प्रशिक्षकाचाही राजीनामा!

पाकिस्तान क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर मॅथ्यू हेडन याची निवड झाली आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज वेर्नोन फिलेंडर गोलंदाज प्रशिक्षक असणार आहे. ( Matthew Hayden & Vernon Philander are the coaches of Pakistan in the T20 World Cup 2021 at UAE). ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत या अनुभवी खेळाडूंचे मार्गदर्शन पाकिस्तान संघाला मिळणार असल्याचे त्यांचे चाहते खूश झाले आहेत.  हेडननं १०३ कसोटी, १६१ वन डे व ९ ट्वेंटी-२० सामन्यांत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यानं कसोटीत ८६२५ ( ३० शतकं व २९ अर्धशतकं) धावा, वन डेत ६१३३ ( १० शतकं व ३६ अर्धशतकं) धावा केल्या आहेत. फिलेंडरनं दक्षिण आफ्रिकेकडून ६४ कसोटीत १७७९ धावा व २२४ विकेट्स घेतल्या आहेत. ३० वन डेत ४१ विकेट्स  व ७ ट्वेंटी-२०त ४ विकेट्स घेतल्या आहेत.  

टॅग्स :पाकिस्तानट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१
Open in App